लोहा| कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाहिले सभापती शंकरराव काहळेकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त इतर कार्यक्रमा वरील खर्चाला फाटा देत त्याचे चिरंजीव ग्रामीण नाटय लेखक शेषराव काहलेकर यांनी शहरातील शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले .माजी आ रोहिदास चव्हाण यांनी असा उपक्रमाची गरज आहे असे सांगितले.
आज शिव छत्रपती माघ्यामिक विद्यालय , लोहा येथे लोहा बाजार समिती (मार्केट कमिटी)चे पहिले सभापती कै.शंकरराव मारोतराव कहाळेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्य अभिवादन करण्यात आले. माजी आ. रोहीदास चव्हाण साहेब यांनी कै.शंकरराव कहाळेकर यांच्या आठवणीं व कार्याला उजाळा दिला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही वाटप करण्यात आल्या. नाट्य लेखक शेषेराव कहाळेकर, नगरसेवक संभाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भारत पाटील पवार, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे प्राथमिक चे मुख्याध्यापक एच.जी.पवार, विलास कहाळेकर, दिलीप कहाळेकर ,बालाजी गवाले, हरिहर धुतमल ,आर आर पिठ्ठलवाड, राहुल पारेकर ,पवार ए.ई श्रीमती एस एम .आढाव ,सौ. मीना कळकेकर ,एस.आर.शेटे,व्ही डी वडजे आदीची उपस्थित होती.
शंकरराव कहाळेकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिव छञपती प्राथमिक व माध्यमिक शाळा लोहा, जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा पांगरी,जय महाराष्ट्र प्राथमिक शाळा,लोहा,आश्रम शाळा माळाकोळी, याकुबखान प्राथमिक शाळा लोहा,श्री संत गाडगे महाराज वि.लोहा या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. जेवणाच्या कार्यक्रमावर मोठा खर्च न करता शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम घेण्यात आला. याचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी विशेष उल्लेख केला .संचलन आर आर पिठठलवाड यांनी तर आभार पवार यांनी मानले.