उस्माननगर, माणिक भिसे| विद्यार्थी रुपी छोट्याशा अंकुराला गुरुने ( शिक्षकाने ) आपले ज्ञानरूपी अमृत ( पाणी पाजविल्यास ) दिल्यास त्या विद्यार्थ्यांचा ज्ञानरूपी महावृक्ष होऊ शकतो ., असे मत हस्य कीर्तनकार व प्रवचनकार हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज लाटकर यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने व्यक्त केले.
मारतळा ता.लोहा येथील ज्ञानेश्वरी प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये नुकताच गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून हास्य प्रवचनकार व किर्तनकार ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाटकर हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तथा प्राचार्य संजय पाटील ढेपे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.गोविंद पालदेवार ,ह.भ.प.कृष्णा महाराज मारतळेकर , पत्रकार बाळासाहेब शिंदे, संजय देशमुख ,अदी मान्यवरांसह शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व वै.ह.भ.प.मामासाहेब मारतळेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन गुरुपुजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाटकर म्हणाले की , इंग्रजी ही जागतिक ज्ञानार्जनाची भाषा आहे.तर मराठी ही आपली मातृभाषा आहे.आपल्या मातृभाषेचा अभिमान व आदर करत इंग्रजी ह्या जागतिक भाषेचा पण आदर, सन्मान केला पाहिजे ., कारण कोणत्याही भाषेची निंदा करून आज पर्यंत कोणाचाही उत्कर्ष झालेला नाही.भाषेशिवाय जगात कुठेही संवाद साधता येत नाही.त्यासाठी कोणत्याही विद्यार्थी तथा व्यक्तीला किमान चार भाषा अवगत असणे अत्यंत आवश्यक आहे.यात आपली मातृभाषा - मराठी, राष्ट्रभाषा - हिंदी , जागतिक भाषा - इंग्रजी व देवभाषा - संस्कृत ह्या चार भाषेतून आपले जीवन आनंदमय, सुखमय, समृद्ध करता येते.इंग्रजी येणे जेवढे आवश्यक आहे., तेवढेच प्राचिन भारतीय ॠषीमुनीनी लिहीलेली साहित्य संपदा समजून घेण्यासाठी संस्कृत भाषा येणे हे ही महत्त्वाचे आहे.
विद्यार्थी रुपी छोट्याशा अंकुराला गुरुने ( शिक्षकाने) आपले ज्ञान अमृत रुपी पाणी दिल्यास त्या विद्यार्थ्यांचा ज्ञानरूपी महावृक्ष होऊ शकतो.आज जग अन्नधान्य संपन्न झालेले आहे.त्यामुळे भुकबळी होत नाही. म्हणून आजच्या जगास अन्नापेक्षा ज्ञानसंपन्न होण्याची व विचारवंतांच्या विचाराची गरज आहे. त्यासाठी जागतिक स्तरावरील थोर विचारवंतांनी लिहिलेले ग्रंथ वाचून ज्ञानी बना असे शेवटी म्हणाले. ज्ञानेश्वरी इंग्रजी शाळेत गेल्या चौदा वर्षांपासून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करत असताना विद्यार्थ्यामध्ये गुरुविषयी आदरभाव संस्कार शिकवले जाते असे प्रास्तविकात मुख्याध्यापक संजय पाटील ढेपे यांनी उल्लेख केला.त्याचा धागा पकडून शेवटी चंद्रकांत महाराज लाटकर म्हणाले की , इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जेव्हा गुरूपौर्णिमा नियमित साजरी केली जाते. तेव्हा निश्चित भारताचे भविष्य उज्ज्वल आहे हे समजते असे म्हणाले.
यावेळी अनेक मान्यवरांसह शाळेतील विद्यार्थ्यांनीही समयोचित भाषणे केली.कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचलन दहाव्या वर्गातील विद्यार्थीनी कु.स्वेता वडवळे हिने केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख चांगुणा भरकडे ,प्रियदर्शिनी सामला , कान्होपात्रा तिरमाले ,स्वाती कपाळे ,शिवपुजा शिकारे ,रुपाली कुलकर्णी ,कावेरी वाघमारे , संजीवनी साखरे , नम्रता वाघमारे, यांच्यासह श्रीराम ढेपे ,विलास गोणारे , पुरुषोत्तम जोशी ,प्रकाश तारु ,या शिक्षकवृंद , सुनिल तारु भास्कर जाधव ,छाया कोलते यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार प्रकाश तारु यांनी व्यक्त केले.