सावरगाव सेवा सोसायटी २५ वर्षा पासून चेअरमन बालाजी पाटील कदम यांच्या ताब्यात -NNL

तेराही जागेवर विजयी


लोहा|
तालुक्याच्या राजकारणात सावरगाव नसरत भागातील सर्व समावेशक नेतृत्व माजी जिल्हा परिषद सर्कस असलेल्या सावरगाव नसरत सेवा सहकारी सोसायटीवर मारकेट समितीचे माजी उपसभापती बालाजी पाटील कदम यांव्हे गेल्या २५ वर्षा पासून सेवा सहकारी सोसायटीवर आपले वर्चस्व आहे यावेळीही त्यांनी   माजी .जि.प.सदस्य विठ्ठलराव शेटकर  यांच्या सोबत  ग्रामविकास शेतकरी पॅनल तयार केले.त्याचे  १३ पैकी १३ जागेवर उमेदवार विजयी झाले.जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे बालाजी पाटील कट्टर समर्थक आहेत.

 मार्केट कमिटीचे व पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजी पाटील कदम यांचेंब १९९५ पासून  सावरगाव नसरत सेवा सहकारी सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व आहे. यंदाच्या सोसायटी निवडणुकीत बालाजी पाटील कदम व .माजी जि.प. सदस्य विठ्ठलराव शेटकर या एकेकाळचे कट्टर विरोधक व काही काळचे मित्र असलेल्या या दोन नेतृत्वाचे समेट झाला.त्याचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले यात माजी उपसभापती बालाजी पाटील कदम  मोतीराम जाधव, माधव देवकते, हावगीराव बेद्रे, रोहिदास भोस्कर, शिवकांता राईकवाडे, ज्ञानोबा वाघमोडे, शिवाजी हाके, नामदेव भावे, देविदास देवकते, बालाजी जामकर, कमलबाई कदम, विमलबाई कदम या उमेदवारांचा समावेश  आहेत.आजी माजी सरपंच तसेच भारत पाटील पवार तसेच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, यांनी बालाजी पाटील यांचे व सर्व विजयी उमेदवार यांचे अभिनंदन केले.बालाजी पाटील यांच्या ताब्यात 30 वर्षा पासून ग्रामपंचायत ताब्यात आहे. बदलत्या व्यवस्थेत दीर्घकाळ संस्था ताब्यात ठेवणे म्हणजे त्या नेतृत्वाचे मोठे काम मानले जाते. भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता ताई देवरे चिखलीकर, भाजप तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील ढाकणीकर, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, केशवराव चव्हाण मुकदम उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी सभापती खुशालराव पाटील बुद्रुक, मा. उपसभापती मारोतराव पाटील बोरगावकर, सरपंच राजु भावे, उपसरपंच प्रकाश चव्हाण, माजी.सरपंच माधवराव बेद्रे, ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील कदम, पाडुरंग देवकते, रामचंद्र बेद्रे, भारत कदम यांनी अभिनंदन केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी