नांदेड| ग्रामीण भागातील नागरिकांचे आयोग्यमान उंचावण्यासाठी गावातील सर्व पाणी स्त्रोताचे पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात यावेत, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील यांनी केले. पाणी व स्वच्छता मिशन विभागाची आढावा बैठक नांदेड जिल्हा परिषदेत आज घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या वतीने आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत व्हीएलएफ प्रशिक्षण, एफटीके कीट, पाणी स्त्रोताचे जिओ फिनीशींग, पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याबाबत आदींसह स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय बांधकाम आदी विषयांची आढावा बैठक उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक व्ही आर पाटील यांनी घेतली.
यावेळी जिल्ह्यातील पंचायत विस्तार अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी अलकेश शिरशेटवार, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार डॉ. नंदलाल लोकडे, कपेंद्र देसाई, कृष्णा गोपीवार, निकीशा इंगोले, चैतन्य तांदूळवाडीकर, विठ्ठल चिगळे, तालुकास्तरीय गट समन्वयक आणि समुह समन्वयक आदी उपस्थित होते.