नांदेड| धर्माबाद तालुक्यातील दिव्याग व्यक्तींना संगणकीय प्रणालीव्दारे आँनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरात दिव्यांग नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गट विकास अधिकारी राजेंद्रप्रसाद बजाज यांनी केले आहे.
धर्माबाद तालुक्यातील दिनांक 12 जुलै तर येताळा जिल्हा परिषद गटातील 26 जुलै तर 2 आँगस्ट रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीव्दारे अॉनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्याकरीता जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम राबविण्याचे नियोजन केले आहे. अॉनलाईन प्रणामध्ये दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी केली असलेल्यांना संगणकीय प्रणालीव्दारे अॉनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्याकरीता शिबीराचे आयोजन येणात आले आहे.
तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीच्या मधील 321 व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र करीता अॉनलाईन नोंदणी केली आहे. शिबीरात नोंदणी केलेल्या व्यक्तींनी सर्व कागदपत्रे सोबत घेऊन उपस्थित रहावे. शिबीरात उपस्थित व्यक्तींची तज्ञ डॉक्टर तपासणी करून संगणकीय प्रणालीव्दारे अॉनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यात येणार आहे. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन उप विभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार डीएन शिंदे, गट विकास अधिकारी राजेंद्रप्रसाद बजाज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वेणूगोपाल पंडित यांनी केले आहे.
शिबीर यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक एम. व्ही. कदम, विस्तार अधिकारी आर.डी. जाधव, कृषी अधिकारी विश्वास आधापुरे, कृषी विस्तार अधिकारी सागर चिद्रावार, शिक्षण विस्तार अधिकारी शिवकुमार पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी वाय एल माळगे आदी परिश्रम घेत आहेत.