नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या मानवविद्या शाखेअंतर्गत हिंदी या विषयात ''इक्कीसवीं सदी के प्रथम दशक की आंबेडकरवादी कविताओं का मूल्यांकन" हे संशोधन शिर्षक घेऊन सध्या सातारा जिल्ह्यातील शंकरराव जगताप कला व वाणिज्य महाविद्यालय वाघोली, ता. कोरेगाव, येथे सहयोगी अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असलेले प्रा.परसराम रामजी रगडे यांनी संशोधन मार्गदर्शक प्रा.डॉ.लक्ष्मण तुळशीराम काळे (हिंदी विभाग प्रमुख राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड, जि.नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण करून अंतिम मौखिक परीक्षेत यशस्वी प्रदर्शन करून पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी मिळवली.
या मौखिक परीक्षेच्या अध्यक्षस्थानी मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अजय टेंगसे सर हे होते तर बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर च्या हिंदी विभागातील प्रा.डॉ. भारती गोरे या होत्या. प्रा.डॉ. परसराम रगडे यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ.उस्मान गणी, प्रा. डॉ. संतोष राठोड, प्रा.बबन जोंधळे, ॲड.मारोती पंढरे, शिवराज वाडीकर साहेब, डॉ. शिवाजी भागानगरे, प्रा.डॉ.सुभाष रामजी रगडे, प्रा. डॉ. संबोधी सुभाष रगडे, प्रा.डॉ.दत्तराम रामजी रगडे, प्रा.अविनाश कोलते, प्रा. बाबासाहेब भुक्तरे,सिद्धांत खिल्लारे यांनी अभिनंदन केले आहे.