लोहा। होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना दहावी नंतर आर्थिक परिस्थितीमुळे शिकवणी मिळत नाही. सोबतचे विद्यार्थी क्लासमध्ये शिकतात आणि पुढे जातात. असा परिस्थितीत सामाजिक दायित्व जोपासत नांदेड येथील बायोलॉजीचे प्रसिद्ध प्रा डॉ वाठोरे व केमिस्ट्री चे प्रा टेकाळे यांनी लोह्यातील एका विद्यार्थ्यांनीना दोन वर्षे मोफत ट्युशन घेण्याचा व शैक्षणिक खर्च करण्याचा संकल्प या क्लासेस प्रमुखांनी केला आहे. यासाठी प्राणिताताई देवरे चिखलीकर यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले.
जुना लोह्यातील एक होतकरू व गुणवंत विध्यार्थीनी तिला दहावीला ९८ टक्के गुण आहेत पण घरची परिस्थिती जेमतेम नांदेड येथे जाऊन ट्युशन व इतर खर्च त्या कुटुंबास परवडणारा नाही ही बाब भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांना कळली .या मुलीच्या अकरावी -बारावी च्या क्लाससेस ची मोफत व्यवस्था नांदेडला झाली तर पुढील शिक्षणास सहकार्य होणार आहे या बाबत प्राणिताताई चिखलीकर यांनी हरिहर धुतमल, सचिन मुकदम यांच्याकडून महिती घेतली. त्यानंतर स्वतःप्राणिताताई यांनी विनाविलंब त्या मुलीच्या शिक्षणासाठी सहकार्य होईल असे आश्वासित केले. नांदेड येथील प्रसिद्ध प्रा निनावटे यांच्याशी स्वतः प्राणिताताई यांनी संपर्क केला व त्या विद्यार्थीनीच्या मोफत शिक्षणा बाबत सहकार्य करण्या संदर्भाने सांगितले.प्रा निनावटे यांनी प्राणिताताई याना शब्द दिला
डॉ वाठोरे व प्रा टेकाळे यांनी प्रा निनावटे यांच्या शब्दाला होकार देत त्या मुलीला मोफत अकरावी बारावी चे क्लासेस मध्ये प्रवेश दिला मुलीच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले.त्यांनी प्रा टेकाळे व डॉ वाठोरे यांचे तसेच प्राणिताताई देवरे चिखलीकर यांचे आभार मानले. आय आय बी अनेक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मदत करते होतकरू व गुणवतांना स्कॉलरशिप देतात मदत करतात .तर दुसरीकडे प्रा टेकाळे-डॉ वाठोरे- प्रा सलगर -प्रा राजूरकर यांच्या ग्रुपने असा होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व स्वीकारून शैक्षणिक मदतीला धावून जात आहेत
आपल्याकडून शिक्षण क्षेत्रासाठी मार्गदर्शन मिळावे यावर आमच्या टीमने फिजिक्स, केमिस्ट्री , बायोलॉजी, मॅथ्स, इंग्लिश अशा कुठल्याही विषयाला एक रुपयाही फीस न घेता उलट आमच्या कॅम्पस द्वारे त्या मुलीला शैक्षणिक साहित्य पण पुरवण्यात येईलअसे डॉ वाठोरे यांनी सांगितले .प्राणिताताई देवरे यांनी प्रा निनावटे तसेच , डॉ वाठोरे व टीमचे आभार मानले गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असेल तर त्यांच्यासाठी आमची पूर्ण टीम मदत करण्यासाठी सदैव तत्पर असेल..असा विश्वास डॉ वाठोरे व टीमने व्यक्त केला आहे