उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांची मूलभूत सुविधा व ग्रामस्थरावर कामे सोयस्कार व्हावेत म्हणून शासनाने ग्रामीण भागात महसूल विभाग, दवाखाना, विजवितरण,अशा अनेक कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली; पण हे कर्मचारी व अधिकारी काळजीपूर्वक वेळेवर मुख्यालयाला राहत नसल्यामुळे त्यांच्या सोयीनुसार अपडाउनमुळे कामे खोळंबल्याने नागरिक परेशान झाले आहेत.
उस्माननगर परिसरातील नागरिकांना पूर्वी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी भेटला तरी वेळेवर कामे होत नव्हते.नागरिकांना दिवसभर लाईन लावावी लागत असे.शासनाने शासन आपल्या दारी ही संकल्पना चालू करून प्रत्येक गावात ग्रामसेवक ,पोलिस पाटील, तलाटी,मंडळ अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, इंजिनिअर, लाईनमन, आदीच्या कार्यालय चालू करून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.पण अनेक वर्षांपासून सदरील कर्मचारी हे आपल्या सोयीनुसार जिल्ह्याच्या ठिकाणाहून आपडाउन करत असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या येण्याची वाट पाहत कार्यालय जवळ ठाण मांडून बसावे लागते.
कधी कधी तर तीन, चार दिवस तर कर्मचारी फिरकत नाहीत.फोन लावला तर अधिकाऱ्यास फोन सुध्दा उचलून बोलत नाहीत.सध्या शाळेतील मुलांचे शिक्षण साठी अत्यवाश्यक कागदावर सही पाहीजे असते.काहीना कशासाठी सही साठी हेलपाटे मारावे लागतात.जर कर्मचारी व अधिकारी मुख्यालयाला राहत नसल्यामुळे नागरिकांची मोठी पंचाईत होत आहे.
सदरील कर्मचारी वेळेवर भेटत नाहीत , सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना व शाळेच्या विद्यार्थ्यांना मंडळधिकारी , तलाठी यांची वाट पाहत असतात.तरी संबंधित अधिकारी यांनी आत्यवश्यक विभागाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.