अर्धापूर, निळकंठ मदने| संपूर्ण महाराष्ट्रवासीयांचे लक्ष वेधलेल्या ओबीसींना आरक्षण मिळते कि नाही याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयामुळे अखेर ओबीसींना न्याय मिळाला आहे, त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत ओबीसींचे प्रतिनिधी दिसतील, त्यांनी जनतेच्या समस्यांची योग्य प्रकारे सोडवणूक करावी, मोठ्या प्रतिक्षेनंतर व लढ्यानंतर ओबीसींना न्याय मिळाला असे प्रतिपादन प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अँड शिवाजीराव हाके यांनी अर्धापूर भेटीत केले.
ओबीसींना निवडणुकीत आरक्षण इंम्पेरीकल डाटामुळे नाकारले होते, गेल्या निवडणुकीत ओबीसी शिवाय निवडणूका घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या ओबीसींना न्याय मिळाला नव्हता,त्या निवडणुकीत ओबीसींचे प्रतिनिधी वंचीत राहिले. तर काही पक्षांनी ओबीसींच्या प्रतिनिधी ला सर्वसाधारण प्रवर्गातून संधी दिली होती.
बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना निवडणुकीत आरक्षण दिल्याचा निर्णय येताच तालुक्यात ओबीसी बांधवांकडून साखर,पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अँड शिवाजीराव हाके म्हणाले कि,ओबीसीं आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात असल्याने निकालाविषयी समाजबांधवात कुतूहल होते,निवडणूक पुढे ढकलल्याने या निर्णयाचा मोठा फायदा ओबीसींना मिळाला आहे, ओबीसींना न्याय मिळाल्याने ओबीसी समाज बांधव आनंदात आहेत.त्यांनी माहिती दिली.