बिलोली। वृक्षाचा वाढदिवस ही संकल्पना संपूर्ण राज्यात राबविण्यासारखे आहे.वृक्षारोपणाचे ध्येय न देता वृक्षाच्या वर्धापनाचे ध्येय निश्चित करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी केले. ते कारला बुद्रुक येथील वृक्ष संगोपन करणाऱ्या श्री संग्राम कांबळे यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षणाधिकारी डाँ.सविता बिरगे,गावच्या सरपंच शिल्पाताई खेळगे ,गट शिक्षण अधिकारी बि.एम.पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंडकर पुढे म्हणाले की, वृक्षारोपणाचे ध्येय निश्चित केले जातात. करोडो रुपये खर्चून झालेली ध्येय निश्चिती पाहता वृक्षाच्या संगोपनाची आणि वाढदिवसाची ध्येय निश्चिती अधिक फायदेशीर असणार आहे. संयोजकांनी झाडे लावणाऱ्यांचा सत्कार आणि सन्मान जेवढा महत्वपूर्ण आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक वृक्षाचे संगोपन करणाऱ्या त्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या व्यक्तींचा सत्कार झाला पाहिजे. त्याचा धागा पकडून मुंडकर यांनी वृक्ष संगोपन करणाऱ्या श्री संग्राम कांबळे यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. वृक्षाचा वाढदिवस ही संकल्पना संपूर्ण राज्यात राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितल.
यावेळी गंगाधर ढवळे,शंकर हमंद,मु.अ.विठ्ठल चंदनकर, शा.व्य.समितीचे अध्यक्ष शिवराज मेंढगुळे,ग्राम पंचायत सदस्य हणमंतराव मिनके,मारोती कांबळे,मारोती बायनोर,बंडू पा.भोसले,संजय गंजगुडे,शंकर हासगुळे,फारूखी ,पांचाळ , संतोष किसवे, गुनवत्ता ,शोभा तोटावार,शामला देशपांडे, गुणवंत हालगरे,सुरेश राठोड,प्रल्हाद ढाकणे,श्रीनिवास मंगणाळे, सविता शिरशेठवाड यांची विशेष उपस्थिती होती.
यासमयी गत वर्षी बालाजी गेंदेवाड यांच्या संकल्पनेतुन कार्ला बु येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या वर्षपुर्ती निमित्त वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे या वृक्ष लागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या केंद्र प्रमुख मडगलवार ,मु.अ मनोहर शिरगीरे ,वाघमारे ,सोमपुरे यांच्यासह बसवन्ना बरबाडे,श्रिकांत मिनके
गत वर्षभरापासून येथील झाडांचे संगोपन करणाऱ्या संग्राम कांबळे यांचा शिक्षक सेनेच्या वतीने अंगभर आहेर देऊन गोविंद मुंडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तालुक्यातील शिष्यवर्ती व नवोदय परिक्षा उतिर्ण झालेल्या कु अक्षरा बसवना बरबडे, कु श्रावणी त्र्यंबक पाटील, कु प्रियांशी सुनील देवकरे, कु स्नेहा देविदास जमदडे विद्यार्थीनींसह त्यांच्या पालकांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यासमयी बालाजी गेंदेवाड यांनी प्रास्ताविक केले. या वर्षी पुन्हा २५० वृक्ष लावणार असल्याचे सांगितले.सदर वृक्ष लागवड व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सेनेचे सायकल मँन बालाजी गेंदेवाड ,राजेश कसलोड,शिवराज गागिलगे,शेख सलिम ,अशोक करवेडकर,गणेश कुर्हाडे,गोपाळ मुत्येपवार,शेख साजीद,यांच्यासह शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शिक्षक, मुख्याध्यापक,केंद्रमुख, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.