नांदेड/नायगाव। नांदेड जिल्ह्याचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याचा दि. 2 अँगस्ट रोजी वाढदिवस आहे या निमित्ताने खा.चिखलीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन नरसी येथे भव्य महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे आशी माहीती आयोजक सुनिल रामदासी यानी दिली आहे.
नांदेड जिल्ह्याचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याचा 2 अँगस्ट 2022 रोजी वाढदिवसा साजरा होणार आहे या निमित्ताने 31 जुलै २०२२ रविवार सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत भगवान बालाजी मंदीरात आहे,या कार्यक्रमाचे उदघाटक.व्यकंटराव पाटील गोजेगांवकर भाजपा जिल्हाध्यक्ष.तर अध्यक्ष म्हणून श्रावण पाटील भिलवंडे सरचिटणीस भाजपा व प्रमुख पाहुणे म्हणून बालाजीराव बच्चेवार प्र,का,सदस्य भाजपा.शिवराज पाटील होटाळकर सरचिटणीस भाजपा.अशोक पाटील मुगावंकर माजी प.स.सभापती,गजानन शिवाजीराव पा.भिलवंडे सरपंच नरसी याची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
या आरोग्य शिबीरात तिरूमला मल्टीस्पेशालटी हाँस्पीटल नांदेड येथील संचालक डाँ,गजानन पाटील रातोळीकर व जवळजवळ 15 डाँक्टराचा संच यावेळी उपस्थित राहुण सर्व आजारावरील तपासणी व औषधी मोफत देणार आहेत. नायगांव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून नरसी आहे या ठिकाणी बाजारपेठ आसुन नागरिकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा आसे अव्हान आयोजक सुनिल रामदासी यानी केले आहे,