नवीन नांदेड। श्री साई पालखी सेवाभावी संस्था सिडको नांदेड च्या वतीने श्रावण मासा निमित्य श्री हजुर साहेब नांदेड सिडकोते शिर्डी पदयात्रेचे आयोजन ३१ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता साईबाबा नगर बिडी कालनी साई मंदिर सिडको येथुन करण्यात आले असून ४१७ किलोमीटर पदयात्रा द्वारे हि यात्रा पंधरा ऑगस्ट रोजी शिर्डी येथे १५ दिवसांनंतर पोचणार आहे या यात्रेत जवळपास शंभर भाविकांचा सहभाग राहणार आहे.
दरवर्षीप्रमाणे याही ११ वर्षी श्री साई पालखी सेवाभावी संस्था सिडको नांदेड च्या वतीने ३१ऑगस्ट २२ रोजी सकाळी १० वाजता सिडको येथील साईबाबा नगर बिडी कामगार कॉलनी साई मंदिर सिडको येथून मान्यवरांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा येथे आयोजन करण्यात आले आहे ,या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भक्तांना नाश्ता व दोन वेळेस चे जेवण देण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी सिडको ते मरळक २६किलोमीटर पायी यात्रा करून मुकामी पोहोचेल तर आरळ ,परभणी,पाळोदी .पाथरी .आष्टी ,पिंपरखेडा ,उंचेगाव पैठण ,नेवासा ,वडाळा महादेव,आभाळे वस्ती, शिर्डी व दिलेल्या नियोजित ठिकाणच्या मुक्मावरून मार्गस्त होऊन शिर्डी मुकामी ४१७किलोमीटर अंतर चालून पंधरा ऑगस्ट रोजी शिर्डीला पोहोचेल ,या यात्रेत सहभागी होणाऱ्या भक्तांनी ,बाबा एन्टरप्रायजेस सिडको , वाघमोडे फब्रीकेशन हडको नांदेड ,साई श्रद्धा वेल्डिंग अण्ड फब्रीकेशन वर्क्स हडको यांच्या कडे संपर्क साधण्याचे आवहान अध्यक्ष गणेश जयसवाल,उपाध्यक्ष मारोती वाघोजी वाघमारे यांनी केले आले.
या पालखी पदयात्रा शुभारंभ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे,माजी आमदार डि.पी.सावंत, माजी महापौर सुधाकर पांढरे, दिलीप कंदकुर्ते,संत बाबा बलविंदर सिंग, माजी नगरसेविका सौ,ललीता शिंदे, मोहनराव घोगरे यांच्या व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व महाआरती नंतर पदयात्रा शुभारंभ होणार आहे.