नविन नांदेड। स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने "हर घर तिरंगा उपक्रम शैलेश कामत, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून सदर उपक्रमाचे उद्घाटन दि.२० जुलै २२ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे अविनाश राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यालयातील संदिप निमसे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सदर उपक्रमासाठी त्यांच्यावतीने १०० भारतीय ध्वज देणगी स्वरुपात वितरणासाठी उपलब्ध करुन दिले व सदर ध्वज अनुज्ञप्ती व इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले. सदर ध्वज प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, नांदेड (महाराष्ट्र शासन अंगीकृत) चे सावित्री महिला लोक संचलित साधन केंद्र, नांदेड यांच्यामार्फत विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
अविनाश राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावितामध्ये कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांना "हर घर तिरंगा या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन केले ज्यामुळे नांदेड जिल्ह्याचा नाव लौकीक होईल व याबाबतची नोंद https://harghartirangananded.in या संकेतस्थळावर करावी असे सांगितले. सदर कार्यक्रमास कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व इतर उपस्थित होते.