नांदेड। नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना नांदेड यांच्या तर्फे व महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना पुणे यांच्या मान्यतेने दि.24जुलै 2022 रविवारी रोजी सकाळी 9.00वाजता धर्माबाद तालुका क्रीडा संकुल एल. बी. एस. महाविद्यालय परिसरातील मैदानावर धर्माबाद, तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथील मैदानावर जिल्हास्तरीय 14,16,18,20 वर्षाच्या आतील मुले व मुली गटातील जिल्हास्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन व राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी यांनी दिली.12 वर्ष आतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेऊ नये.
या जिल्हा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त ( पात्रता कामगीरी प्राप्त करणारे) खेळाडू महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे ३६ साव्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धे करीता नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील उस्मानाबादला दि.10 ऑगस्ट 2022 रोजी 14 वर्षाखालील( दि.16 नोव्हेंबर 2008 ते 15 नोव्हेंबर 2010 दरम्यान जन्मलेले) व अमरावतीला दि 27 व 28 ऑगस्टला 16 वर्षाखालील ( दि.16 नोव्हेंबर 2006 ते 15 नोव्हेंबर 2008 दरम्यान जन्मलेले) मुंबईला दि.19 ते 21 ऑगस्टला 18 वर्षाखालील ( दि.16 नोव्हेंबर 2004 ते 15 नोव्हेंबर 2006 दरम्यान जन्मलेले) व 20 वर्षाखालील (दि.16 नोव्हेंबर 2002 ते 15 नोव्हेंबर 2004 दरम्यान जन्मलेले) खेळाडूंसाठी राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत. करीता धर्माबाद या ठिकाणी पात्रता कामगिरी प्राप्त खेळाडू नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.तसेच आंतर जिल्हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा साठी खेळाडूंची निवड याच स्पर्धेतून करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी येताना खेळाडूंनी सोबत नाव नोंदणीसाठी एक फोटो , मुळ १० वीची सनद , मूळ जन्म दाखला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत, आधार कार्ड, प्रत्येक क्रिडा प्रकारासाठी १०० रु शुल्क व प्रथम नोंदणी शुल्क १५० रु घेऊन उपस्थित राहावे. राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्पर्धेसाठी किमान कामगिरी पात्रता प्राप्त करणाऱ्या खेळाडूस पुढील स्पर्धेत सहभागी होता येईल. तसेच सदरील स्पर्धेत पात्रता कामगिरी प्राप्त खेळाडूसच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धा निरीक्षक म्हणून योगेश थोरबोले सचिव उस्मानाबाद जिल्हा ॲथलेटिक्स संघटना हे उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्हयातील 100मी., 200मी. , 400मी., 600मी.,800मी,5000मी धावणे,10कि.मी.धावणे, 20कि,मी.,30 कि.मी. चालणे तसेच गोळा फेक, भाला फेक , थाळी फेक , हातोडा फेक, लांब उडी, तिहेरी उडी, रिले, क्रॉस कंट्री, या प्रकारामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूनी जास्तीत जास्त संख्येने व आवश्यकत्या तयारीनिशी उपस्थित राहावे.
असे आवाहन नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर ,उपाध्यक्ष डॉ . अर्जुन मापारे, डॉ दि.भा. जोशी, डॉ उमेश भालेराव, जिल्हा क्रिडाधिकारी नादेड राजेश्वर मारावार, गुरुदीपसिंघ संधू, नारायण सूर्यवंशी, कुमार कुलकर्णी , अमरीक सिंघ वासरीकर , अविनाश रामगिरवार ,महेंद्र कुडगुलवार , प्रशांत जोशी , राजेश तिवाड़ी ,किशोर पाठक , विनोद गोस्वामी, प्रवीण साले, शारदा कदम, सुरेश पद्मावार, सुनिल देशमुख सगरोळी, रूपाली कुलकर्णी, किरण कुलकर्णी भगवान नागरगोजे, विष्णू पुर्णे, प्रा.डॉ.उदय चव्हाण, प्रा.डॉ. बळीराम लाड, प्रा. थोटे, प्रा.अमृत जाधव, वैभव दमकोडवार , डी.डी. चव्हाण, अनंत बोबडे, मुजाजी काकडे, शिवकांता देशमुख,निलेश खराटे,गोविंद पांचाळ,बी.डी.जाधव, बालाजी तोरणेकर, सविता पतंगे , महेमुदा खान , लक्ष्मण फुलारी, बालाजी भवानकर, संतोष सोनसळे, प्रा.शिवाजी जाधव,संतोष आणेराव, ज्ञानेश्वर सोनसळे, शेख शब्बीर , संतोष वाकोडे, बालाजी गाडेकर, शिवा गोस्कुलवार , अहमद लढ्ढा, रविकिरण क्षीरसागर, विजय गव्हाणे , डॉ. महेश जाधव , शेख गौस शेख शादुल,हनुमंत कदम ,गंगाधर हबर्डे , दिनेश उमरेकर, ज्ञानेश्वर कोडलांडे , नंदू जाधव, ईश्वर नांदेडकर, शुद्धधन नरवाडे आदी पदाधिकारी यांनी केले आहे अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 8625021219 /8421274392 /7588430145 / 8805023440 / 9921855097 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.