हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सरसम येथील एका युवा शेतकऱ्याने कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून आपल्या शेतात आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सरसम गावावर शोककळा पसरली आहे. अमृता नारायण पतंगे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत सावचित्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील युवा शेतकरी अमृता नारायण पतंगे, वय ४१ वर्ष यांनी दिनांक ०३ जुलै रोजी दुपारी १५.१५ वाजेच्या सुमारास यांनी गावातील स्वत:च्या शेतात कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच नेटवाईकांनी सुरुवातील सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर परिस्थिती गमाभीर असल्याने विष्णुपूरी नांदेड येथे अमृता नारायण पतंगे, वय ४१ वर्षे, याना उपचारासाठी हलविण्यात आले होते.
नांदेड येथे दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अशी माहिती पोहेकॉ.एम के गोटमवाड, ने. पोस्टे नांदेड ग्रामीण यांनी दिल्यावरुन पोस्टे हिमायतनगर येथे आ. मृ.२०/२०२२ कलम १७४ सीआरपीसी कायदा प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भुसनर यांचे मार्गदर्शनाखाली मपोहेकॉ. कागणे मैडम हे करीत आहेत.