बहूचर्चित मेळगांवचे ग्रामसेवक यरसनवार यांना बदलीनंतरही खुर्ची सोडवेना -NNL

नुतन गटविकास अधिकाऱ्यांकडूनही पाठराखण ; समस्यांनी त्रस्त सरपंचासह ४ ग्रा.पं.सदस्य उपोषणाच्या पावित्र्यात !


नायगांव बा/नांदेड।
बहुचर्चित मेळगांव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एन.एस.यरसनवार हे बदलीनंतरही तब्बल आठवडाभरापासून आपल्याकडील पदभार देण्यासाठी तारीख पे तारीख देत  असतांना त्यांच्यावर थेट कारवाईऐवजी नुतन गटविकास अधिकारी एल.आर. वाजे मात्र जणू बघ्याची भूमिका घेत त्यांची पाठराखणच करित असल्याने  विद्यार्थी व योजनानिहाय लाभार्थी यांची विविध प्रमाणपत्रे मिळण्यास आणि जनतेच्या मूलभूत गरजा पूर्णत्वास अडसर निर्माण झाला असल्यानेच गांवात वाढलेल्या समस्या व त्यातून सहन करावा लागत असलेल्या जनतेच्या रोषामूळे मेळगांवचे सरपंच मोहन धसाडे यांच्यासह तब्बल चार ग्रामपंचायत सदस्यांनी पून्हा एकदा पंचायत समिती कार्यालयासमोर येत्या ११ जुलैपासून लोकशाहीमार्गाने आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला असून याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे ईशारा दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की, ग्रा.पं.मेळगांव येथिल ग्रामसेवक एन.एस. यरसनवार यांनी सरपंच मोहन धसाडे यांच्या ग्रामपंचायतीच्या कोऱ्या चेकबुकवर तसेच,त्यांच्यासह तब्बल चार सदस्यांच्या मासिक व ग्रामसभांच्या कोऱ्या रजिस्टरवर स्वाक्षरी घेतल्या परंतू,विनंतीनंतरही ते विषय व माहिती देण्यास टाळाटाळ चालवित होते तसेच, योजनानिहाय विकास कामे हस्तकांकडून दर्जाहीन व कागदोपत्रीच पूर्ण करुन घेतांनाच गांवात जनतेच्या मूलभूत गरजा असलेल्या रस्ते, पाणी,विज,आरोग्य,नालीसफाई व गांवची स्वच्छता,करवसुली आदी महत्वपूर्ण बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते. त्याचबरोबर, शासनाच्या विविध योजनांची माहिती न देणे,गांवात मुख्यालयी वास्तव्य दूरच मात्र आठवड्यातून एखादे-दोन दिवसही कार्यालयात येत नसल्याने येथिल विद्यार्थी आणि योजनानिहाय लाभार्थी यांना विविध प्रमाणपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी दि.२६ जून रोजी नायगांव पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंच व चार ग्रामपंचायत सदस्यांनी आमरण उपोषणास बसले होते.

उपोषण बसल्यानंतर तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांनी सदर प्रकरणात चौकशीसाठी द्विसदसीय समिती गठीत केली होती तर,ग्रामसेवक यरसनवार यांच्या बदलीचे आदेश काढून त्यांच्याजागी ग्रामसेवक वाय.डी.सुर्यवंशी यांची नियुक्ती करुन त्यांना तात्काळ पदभार देण्याचे आदेशित केले होते.परंतू,या आदेशानुसार आजपर्यंत ग्रामसेवक यरसनवार यांनी आपला पदभार दिलाच नाही व बदलीचे कारण दर्शवून मेळगांवाकडे फिरकतही नाहीत.याबाबत गटविकास अधिकारी पदावर नव्यानेच रुजू झालेल्या एल.आर.वाजे यांच्याकडेही आठवडाभरापासून दररोज सरपंच,सदस्य व ग्रामस्थ सातत्याने विनंती करित आहेत मात्र ते संबंधितांवर थेट कारवाईसाठी टाळाटाळ करुन याबाबत पंचायत विभागाचे कर्तव्यदक्ष (!) विस्तार अधिकारी शेख लतिफ यांच्यामार्फत संबधित ग्रामसेवकाकडून पदभार मिळविण्यासाठी तारीख पे तारीख घेत आहेत.

परिणामी मेळगांवचे ग्रामस्थ विविध समस्यांनी त्रस्त बनले आहेत. त्यामुळे ग्रामसेवक यरसनवार यांच्याकडील पदभार तातडीने काढून घ्यावा सोबतच,त्यांची पाठराखण करण्याऐवजी त्यांच्यावर थेट कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या दि.११ जुलै पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे गटविकास अधिकारी यांचे नांवे सरपंच मोहन धसाडे व गंगाधर कंदरवाड,माधव शिंदे, सौ.भारतबाई महिपाळे या ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी तक्रार दिली असून सदरील निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,मुख्य सचिव व संबधित वरिष्ठांना पाठविण्यात आल्याचे सरपंच धसाडे यांनी सांगितले.

...म्हणूनच सोडवेना खुर्ची ! विशेष बाब म्हणजे गोदाकाठी वसलेल्या या ग्रामपंचायतीला महसूल विभागाकडून गौण खनिजांच्या उत्खननापोटीचे राॅयल्टीतील स्वामित्व धन म्हणून वर्षाकाठी लाखो रुपयांचा विकास निधी मिळत असतो त्यात भरीस भर म्हणून लोकप्रतिनिधींकडून सुचविलेली कामांचा व शासनाकडूनही मिळणारा योजनानिहाय विकासनिधी त्यातील बहुतांश कामे वर्षानुवर्ष कागदोपत्रीच पूर्ण त्यात संगनमतातून मिळणारी आर्थिक उलाढाल अन् गौण खनिजांच्या उत्खननातील 'वरकमाई' यामुळेच संबधित ग्रामसेवक महाशयांना येथिल खुर्ची सोडवत नसल्याची चर्चा ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळाले.

नुतन गटविकास अधिकाऱ्यांकडून जनतेच्या अपेक्षा !

महत्वाची बाब म्हणजे अधिकारी-कर्मचारी यांच्या मनमानी कार्यपद्धतीमूळे गत काही वर्षांपासून वादग्रस्त बनलेल्या नायगांव पंचायत समितीमध्ये एल.आर.वाजे यांनी रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात कर्तव्यतत्परता येण्याची चिन्हे होती.परंतू,गत आठवडाभरात त्यांनी आपल्या कार्य व कर्तव्यतत्परतेची चुणूक दाखवून देण्याऐवजी तालुक्यातील ग्रामपंचायतीनिहाय भ्रष्टाचाराला खतपाणी देत तक्रारदार व लोकप्रतिनिधी- प्रशासन यामध्ये जणू झुंज वाढवित तक्रारीनिहाय चौकशींचा कागदोपत्री मेळ जमवून स्वतःला कर्तव्यदक्ष असल्याचे भासवून वरिष्ठांची दिशाभूल करीत संगनमतातून स्वहित साधण्यात माहिर असलेल्या पंचायत समितीमधील पंचायत विभागाच्या एका बहुचर्चित विस्तार अधिकारी यांच्याशी वाढलेली जवळीकता दूर करण्यासह त्यांचेवरच लगाम घातला व स्वतःच जनतेच्या वाढत्या समस्या आणि गांवपातळीवरच्या तक्रारीनिहाय चौकशा अन् अखत्यारितील अधिकारी- कर्मचारी यांच्यासह ग्रामसेवक व लोकप्रतिनिधींच्या वेळोवेळी बैठका घेत त्यातून मार्गदर्शन करित येथिल वाढता समन्वयाचा अभाव, प्रशासनातील अनियमितता दूर करून प्रशासकीय कर्तव्यदक्षता दाखविली तरच,तालुक्याचा विकास स्तर उंचावेल अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी