हिंगोलीचे खा हेमंत पाटील यांनी केलेल्या मागणीला यश
नांदेड/हिंगोली/हदगाव। लोकसभा मतदार संघातील नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील तामसा येथील सरसेनापती नेताजी पालकर समाधी स्थळी स्मारक उभारण्याची मागणी खा हेमंत पाटिल यांनी करताच केलेल्या मागणीची मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून तात्काळ दखल घेतल्या गेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत असलेले प्रतिशिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांचे समाधी स्थळ हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी आहे. त्यांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी स्मारक व्हावे जेणेकरून हे स्मारक येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरेल आणि सरसेनापती नेताजी पालकर यांच्या कार्याचा त्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाचा उचित गौरव झाला पाहिजे.
अशी मागणी आज खा हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली असता त्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रशासनास पुढील कार्यवाही साठी सूचना केल्या.