लोहा| मन्याड खोऱ्यात खारीक खोबऱ्यांच्या हाराने आदरातिथ्य करण्याची परंपरा रूढ आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ५० किलो वजनाचा खारीक खोबऱ्याचा हार घालून मुंबईत भव्य सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे लोह्याचे माजी नगरसेवक रमेश माळी यांनी हा सत्कार केला.मन्याडीचा आगळ्या वेगळ्या सत्काराची जोरदार चर्चा झाली एवढेच नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री यांच्या फेसबुकवर तो फोटो झळकला.
राज्यात सत्तांतर झाले.जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचा थेट परिणाम जाणवू लागला आहे. मुख्यमंत्री यांनी नांदेड उत्तर साठी भरभरून दिले. शिवाय हे सरकार शिवसेना -भाजपचे आहे. त्यामुळे जिल्ह्याचे खा चिखलीकर तसेच चारही आमदार पक्ष पदाधिकारी यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडीत लोह्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक व लोहा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणारे उमेदवार रमेश माळी मागील आठवड्यात बुधवारी ( १३ जुलै) रात्री बारा वाजता थेट वर्षा बांगला गाठला आणि त्यांनी आपली व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडली. त्यांना भेटण्यासाठी कोणाचीही शिफारस लागली नाही.
आपल्या सारख्या सामान्य शिवसैनिकांना राज्याचे मुख्यमंत्री भेटतात याचा आनंद रमेश याना झाला ते भारावून गेले. त्याच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी नोंद घेतली. रविवारी मुंबईत एका मेळाव्यात माजी नगरसेवक रमेश माळी यांनी मन्याडी खोऱ्यातील आदरातिथ्य परंपरेची जपणूक करीत लोहयाहून 50 किलो वजनाचा खारीक खोबऱ्याचा हार बनवून मुंबईला नेला आणि तो मुख्यमंत्री श्री शिंदे यांना घातला. कार्यक्रमात या खारीक खोबऱ्याच्या हराची जोरदार चर्चा झाली. स्वतः मुख्यमंत्री यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर हा खारीक खोबऱ्याच्या हाराचा फोटो अपलोड केला. माजी नगरसेवक रमेश माळी यांच्या वाळू टिप्परवर तसेच त्याच्यावर व सहकार्यावर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात वेगवगेल्या कलमां अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्या असंगाने संबंधित पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री यांच्या कडे त्यांनी तक्रार केली तसे निवेदन दिले.या बाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती घेऊ अन्याय होणार नाही असे रमेश माळी यांना आश्वसित केले आहे आपल्या सारख्या सामान्य शिवसैनिकाना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दोनदा भेटता आले माझ्या वरील अन्याय मांडता आला.आपणास न्याय मिळेल . खरंच .शिंदे सरकार सामान्य जनतेच्या सरकार आहे अशी भावुक भावना रमेश माळी यांनी व्यक्त केली. त्याच्यावरील गुन्ह्या बाबत त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. एकंदरीतच मन्याडच्या खारीक खोबऱ्याच्या हाराची मात्र जोरदार चर्चा मुंबईत झाली.