नांदेड। जिल्ह्यातील दिव्यांग विशेषतः मतिमंद शाळेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ४ महिन्यांपासून थकले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वेतन थकल्यामुळे हे सर्व कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले असून दैनंदिन व्यवहार करणे कठीण झाले आहे.
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाला मुलांच्या शिक्षणाच्या फिस, पुस्तके आदी खर्चा असतो. परंतु, वेतन रखडल्याने अनेकांच्या मुलांना अपेक्षित शाळांत प्रवेशदेखील घेता आला नाही. तर काही कुटुंबियांवर अक्षरश: उपासमारीची वेळ ओढावली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देऊन त्यांना मुख्यप्रवाहात
शिक्षक करतात. अशा या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नेहमीच वेतन थकीत असो की वेतन आयोग लागू यासाठी प्रतीक्षाच करावी लागते. शासनाच्या वतीने दिव्यांगासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. मात्र अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना आणण्याचे कार्य या शाळेतील विशेष निधी मिळूनही वेतन नाही २० दिवसांपूर्वी चार पैकी केवळ एक महिन्यांचा निधी
प्राप्त झाला आहे. मात्र या एका महिन्याचेही वेतनही देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कर्मचारी वेतनाच्या गंभीर प्रश्नांकडे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तसेच जिपच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी लक्ष घालून वेतन नियमित व्हावे, यासाठी प्रयत्न करावे तसेच निधी प्राप्त झाल्यानंतरही वेतनास विलंब करणायांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.
आता चार महिने वेतन नाही यावर ज्ञानाचे धडे देणारे शिक्षक कायमच इतरांचाही विश्वास बसत नसल्याने दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. आता उधारी मिळणेही अवघड झाले आहे. चार महिन्यांचा विमा हप्ता थकल्याने दुर्देवाने काही घटना घडल्यास यास शासन की प्रशासनाला जबाबदार धरावे, असे प्रश्न शिक्षक
जिल्ह्यात मतिमंद विद्यार्थ्यांसाठी जवळपास १५ ते १६ शाळा असून या सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांची संख्या तीनशेच्या घरात आहे. या मतिमंद शाळेच्या कर्मचाऱ्यांचे चालू आर्थिक उपस्थित करीत आहेत. वर्षांपासून म्हणजेच एप्रिलपासून वेतन थकले आहे. चार ४ महिण्यापासून वेतन थकल्याने या शाळेतील कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीत परिवारा समवेत पर्यटनाचा लाभ घेता आला नाही. तसेच शाळा सुरु झाल्यानंतर त्यांच्या मुलांचे पाठयपुस्तक, शाळेचे शुल्क, गणवेश घेतांना स्वतः नौकरीला असतांनाही इतरांकडे उसनवारी करावी लागली आहे.