अर्धापूर| तलाठी या पदावर पारदर्शक यशस्वी काम करण्याचा योग पार्डीकरांच्या आर्शीवादाने आला असून,माझ्या पदोन्नतीच्या पुढील कार्यकाळात मला काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन मंडळ अधिकारी या पदावर पदोन्नती झालेल्या सौ.बनसोडे यांनी केले.
अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथील सज्जाच्या तलाठी सौ.बनसोडे यांची उमरी तालुक्यात मंडळ अधिकारी या पदावर पदोन्नती झाल्याने बदली झाली,त्यांनी ५ वर्षं तलाठी म्हणून यशस्वी काम केले.त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच निळकंठराव मदने हे होते.
प्रमुख पाहुणे निळू देशमुख,बापूराव हापगुंडे,महेश देशमुख, प्रसाद हापगुंडे,प्रा.संतोष हापगुंडे,अमित देशमुख,शंकर हापगुंडे यांची उपस्थिती होती.यावेळी गावकऱ्यांनी सौ.बनसोडे यांचा शाल,हार व भेटवस्तू देऊन स्वागत केले, याप्रसंगी सौ.बनसोडे यांनी पार्डी सज्जांतील चार गावकऱ्यांनी केलेले सहकार्य अविस्मरणीय असल्याचे सांगितले, यावेळी आदिंनी मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी नितीन लेकुळे, ज्ञानेश्वर दहिभाते, अवधूत वाघमोडे,शाम गिरी,इनूस नदाफ,रशीद शेख,पाशू शेख यांची उपस्थिती होती.