भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन साजरा -NNL


नांदेड|
भारतीय मजदूर संघाचा 68 वा वर्धापन दिन नांदेड येथे जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी एडवोकेट चंद्रकांत जहागीरदार तर भूमन्ना बाळापुरकर श्री श्रीरंग कदम राजाराम सामलेटी प्रकाश रावके  श्री विजय शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या सुरू आहे याचे औचित्य साधून भारतीय मजदूर संघात प्रदीर्घकाळ कार्य करणाऱ्या तसेच भारतीय मजदूरसंघाची व्याप्ती वाढवण्यात ज्यांचे प्रत्यक्ष योगदान लाभले आणि ज्यांचे वय 75 वर्षांच्या वर आहे अशा कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. भारतीय डाक विभागात ज्यांनी आपली सेवा पूर्ण केली असे श्री विजय शर्मा, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात ज्यांनी आपली सेवा पूर्ण केली असे श्री भूमन्ना बाळापुरकर व श्रीरंग कदम, बिडी उद्योगात ज्यांनी आपली सेवा दिली असे श्री राजाराम सामलेटी, एलआयसी भारतीय जीवन बीमा निगम मध्ये आपली सेवा देणारे श्री प्रकाश रावके यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार देत सत्कार करण्यात आला आणि त्यांनी भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून सर्वसामान्य मजदूर वर्गाची जी सेवा केली, तळागाळातल्या मजुरांचे नेतृत्व केले, कमगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय मतदारसंघाच्या माध्यमातून आणि त्याच्या संलग्न शाखांमधून ज्यांनी अहोरात्र काम करून भारतीय मजदुर संघाची पताका फडकवत ठेवली अशा कार्याचा गुणगौरव यावेळी करण्यात आला. 

या वर्धापन दिन सोहळ्याला स्वाती कवठे, राम दुगाळे, शंकरराव जाधव, चंद्रशेखर मान, लक्ष्मण आंबटवार, पांडुरंग इप्ते, एस बी राहेगावकर, बी एम सरसे, प्रकाश संगणवार, प्रमोद वैद्य, एकनाथ थोरात, विनायक लोहकरे, मिलिंद धर्मापुरीकर, अनुप जोंधळे, डीपी देशपांडे, प्रकाश जोशी जयंत दंडवते प्रशांत वैद्य, एस एन हटकर, आरबी बाकलीवाल, चंद्रकांत जहागीरदार, बालाजी निलेवार, रोहिदास जोगदंड, प्रमोद देशमुख, शाम मंठाळकर, जगन्नाथ लेंडेवाड, अनिल खामकर,अशा सर्वांची उपस्थिती होती.

भारतीय मजूर संघाच्या वाढीसाठी संपर्क दौऱ्याचे माध्यम हे प्रभावी ठरले होते प्रभावी ठरत आहे आणि यापुढेही प्रभावी ठरेल आणि त्यासाठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न असणाऱ्या विविध शाखांमधील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावर विस्तृतपणे विचार करावा आणि त्याची जिल्हाभरामध्ये अंमलबजावणी करावी म्हणजे भारतीय मजदूर संघाची पताका ही अनंत काळापर्यंत फडकत राहील असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात चंद्रकांत जहागीरदार यांनी केले.

भारतीय मजदुर संघाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी निलेवार, सरचिटणीस अनुप जोंधळे, कोषाध्यक्ष राजमल  बाकलीवाल, रोहिदास जोगदंड, कामगार महासंघाचे प्रमोद देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. वर्धापन दिन सोहळ्याचे सूत्रसंचालन रोहिदास जोगदंड यांनी केलं तर आभार जिल्हाध्यक्ष बालाजी निलेवार यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी