उस्माननगरची कचरा घंटा गाडी विचारना करीत आहे
उस्माननगर, माणिक भिसे| मागील अनेक वर्षांपासून उस्माननगर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायथ्या जवळ एकाच ठिकाणी उभी असलेली कचरा घंटा गाडी बंद अवस्थेत असून बीडीओ साहेबांना विचाराना करीत आहे ,सांगा राया ....सांगा मी कशी दिसते!
उस्माननगर येथील गावातील नालीतील घाण कचरा काढण्यासाठी कचरा घंटा गाडी घ्या असा सुर नागरिक, सदस्य यांनी वेळोवेळी ग्रामसेवक यांना लावत होते.गावातील नालीतील घाण कचरा त्या घंटागाडी मध्ये टाकून गावाच्या बाहेर काढून नेता येईल.गाव स्वच्छ, निरोगी राहील ,नाली स्वच्छता ठेवा ,गाव स्वच्छ ठेवा असे शासन आवाहन करण्यात येत होते. परिसरातील नागरिक बिमार, आजारी पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे आवाहन करीत होते.गावात नालीतील घाण कचरा काढण्यासाठी ग्रामपंचायतला रोजंदारीवर एक ट्रॅक्टर व कामगार शोधून त्यांच्याकडून काम करुन घेत होते.शासन नेहमी स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च करीत आसते.
येथील ग्रामपंचायतने तत्कालीन ग्रामसेवक यांनी १४ वित्त आयोगातून एक ओला कचरा घंटा गाडी खरेदी केली ; असून तेव्हा पासून ती घंटा गाडी जागेवरच उभी राहून ... राहून त्या गाडीची बॅटरीच चोरीला गेली. त्या घंटागाडी कडे कोन्ही स्व:ताची गाडी म्हणून गांभीर्याने घेत नसल्याने शोकांतिका वाटत आहे.तत्कालीन ग्रामसेवक यांनी गावासाठी कचरा घंटा गाडी खरेदी केली ,पण त्या गाडीकडे लक्ष न देता रोजंदारीवर ट्रॅक्टर लावून घाण कचरा काढण्यात पैसा खर्च करावा लागत आहे.जाग्यावरच घंटागाडीचे पार्ट गंजून जात आहेत.पावसाच्या पाण्याने ट्रॅली भरत असल्याने गंज चढला आहे.तुम्ही राया मला मोठ्या हौशीने मला तुमच्या घरी (घंटागाडी )तुम्ही आणली ,सांगा ना....राव बीडीओ साहेब ...सांगा मी कशी दिसते...! अशी विचारणा उभी असलेली घंटा गाडी करीत आहे..