हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पळसपुर येथील अल्पभुधारक शेतकरी शेतीपिकाला फवारणीसाठी पाणी आणण्यासाठी विहीरीवर गेलेल्या शेतकऱ्याचा शेतातील विहिरीत पाय अचानक घसरला. विहीरी मध्ये पाणी खुप असल्याने सदरील शेतकऱ्यालाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून अपघाती दुर्देवी मृत्यु झाला. मृत्यु समयी त्यांचे वय ४५ होते. बालाजी किसनराव कदम असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यात गेल्या काहीदिवसापूर्व पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके बहरली आहेत. त्यातच तणकट वाढले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना फवारणी करावी लागत आहे. अश्याच कारणाने आज शेतातील पिकाला फवारणी करण्यासाठी शेतकरी बालाजी किसनराव कदम हे तयारीत होते. त्यासाठी आपल्या विहिरीतून फवारणीसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा पाय घसरला अंडी ते थेट विहिरीत पडले. विहीरीमध्ये पाणी खुप असल्याने सदरील शेतकऱ्याला पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून अपघाती दुर्देवी मृत्यु झाला. मृत्यु समयी त्यांचे वय ४५ होते. त्याच्या मृत्यू पश्चात दोन मुले, एक मुलगी, आई, भाऊ, भावजयी, असा मोठा परीवार आहे.
या घटनेची माहिती बालाजी कदम यांचे लहाने बंधु संदीप कदम यांनी दिल्याने हिमायतनगर पोलिस कर्मचाऱ्यांनी दखल होऊन पंचनामा केला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कांगने मँडम करत आहेत. पंचनाम्यानंतर ग्रामिण रूग्णालय हिमायतनगर येथे मयत शेतकऱ्याचे प्रेतावर शव विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री त्याच्या पार्थिव देहावर अत्यंसंस्कार करण्यात आले.