हदगाव, शे.चांदपाशा| शहराला पिण्याच्या पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फार जुनी झालेली असुन, पाणी पुरवठ्याची व्यवस्था काही अंशी कोलमडेलेली आहे. शहरवासीयांना नियमित होण्यासाठी ४७ कोटी ३२ लाख रु मंजुर करण्यात आल्याची माहीती मंगळवारी पञकार परिषदेत माहीती दिली.
ते अधिक माहीती देतांना त्यांनी सागितले की हदगाव शहराला 1975 ते 1980 नंतर शहराची हद्द कायम करण्यात आली तात्कालिक राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आमचे नेते मा. आशोकराव चव्हाण मार्फत ही हद्दवाढीचा प्रश्न धसास लावला. त्यानंतर दोनवर्ष कोरोना मध्ये गेले नंतर तात्कालिक नगरविकास मंञी व आताचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदें यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियानातंर्गत त्याच्य कडून मंजुर करण्यात आली.
या योजनेच्या कामाच्या टेंडर प्रक्रिया पण पुर्ण झाल्याची माहीती आमदार मोहद्यानी दिली. शहराची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहता हे लगेच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम दिड वर्षात पुर्ण होईल असा आशावाद ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहराच्या प्रति व्यक्तीस 135 लिटर पाणी मिळेल तसेच शहरातील दत्त बर्डीवर दोन पाण्याचे टँक तसेच नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प खास नागरिका करिता राहील हे तसेच 25वर्षाच हे नियोजन आहे आशी माहीती ही त्यांनी यावेळी दिली.
फक्त एक मिनिट उशीर-आ. जवळगावकर - सोमवारी विधानसभेत शिवसेना- भाजपा सरकारच्या विश्वासमत ठरावाच्यावेळी देव दर्शन करुन मी लगबगीनं सभागृहच्या दारासमोर केवळ एक मिनिट उशीर झाला. तेव्हा सभागृहाचे दार बंद करण्यात आल्याने त्यामुळे मी विश्वासमत ठरावाच्या वेळी भाग घेवू शकलो नाही अशी माहीती ही आ. जवळगावकर यांनी दिली. सध्याचे सरकार टिकणार आहे काय या बाबतीत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख मा. शरद पवार यांनी सांगितले अस त्यांनी मिश्किलपणे सागितले.