टवाळखोरी करणार्यांना अद्दल घडविण्यासाठी पोलीस निरीक्षक भुसनर यांची धूम गाड्यावर कार्यवाही -NNL

महिला - मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी जागरूकता दाखवून टवाळखोऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सहकार्य करावे  

यासाठी लवकरच बसस्थानक परिसरात पोलीस चौकी स्थापण केली जाईल


हिमायतनगर, अनिल मादसवार| अवघ्या ३५ दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे, तर सॅन उत्सवाची रेलचेल सुरु झाली आहे. कोरोनानंतर शाळा - कॉलेज पूर्वपदावर आले असून, रस्त्यावर महिला - मुलींची ये - जा वाढली आहे. मात्र या काळात शहरात काही अल्पवयीन बालके आणि धूम स्टाईलने वाहने चालविणाऱ्यांची असंख्य वाढली आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याची बाब समोर आल्याने येथील पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनर यांनी टवाळखोऱ्या करणाऱ्या आणि धूम स्टाईलने वाहने चालविणार्याना बद्धल घडविण्यासाठी वाहन तपासणी मोहीम सुरु केली आहे. यामुळे युवकांना शिस्त लागून ट्वाळोर्यांचा बंदोबस्त होईल आणि महिला मुलींची सुरक्षा होईल. यासाठी लवकरच बसस्थानक परिसरात पोलीस चौकी स्थापण केली जाईल अशी माहिती त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.  

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे शाळा- कॉलेज, महाविद्यालय मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून हिमायतनगर शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या मूळ - मुलींची मोठी संख्या आहे. या ठिकाणी येणाऱ्या मुली येथील श्री परमेश्वर मंदिरात सुट्टीच्या काळात डब्बा खाण्यासाठी येतात. यंदा कोरोनानंतर सर्वच सण उत्सव हर्षोल्हासात साजरे होणार आहेत. हिमायतनगर शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने येथील श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक आणि शहरातील महिलांची ये - जा सुरूच असते. या संधीचा फायदाघेत शहरातील काही बुलेट सवार धूम स्टाईलने गाड्या चालवून कट मारत आहेत. तसेच हातवारे करणे, दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे यामुळे महिला - मुलींची छेडछाडीच्या घटना वाढत आहेत. या प्रकारावर नियंत्रण आणून महिला मुलींना सुरक्षा देण्यासाठी पोलीस निरीक्षक यांनी मोहीम सुरु केली आहे.


याबाबत पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भुसनर यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, बिट जमादार अशोक सिंगनवार, डीएसबीचे कुलकर्णी, राठोड, मेंडके, साखरे  व पथकाने शहरातील चौकात, शाळा, कॉलेज, रस्त्यावर आणि मंदिर परिसरात बंदोबस्त लावून ट्रिपल सीट, धूम गाड्यांच्या तपासण्या करून एक प्रकारे शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. या काळात काहींना तर दंडात्मक कार्यवाही केल्यामुळे सध्यातरी विना परवाना वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन आणि टवाळखोर करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सण - उत्सवाच्या काळात शहरासह तालुक्याची शांतता व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या कार्यशैलीवरून सध्या तरी दिसते आहे. 

आजपासून सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी जवळपास १५ वाहनावर कार्यवाही करून अद्दल घडविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे परवानाधारक लोकांनी आपले वाहनाची कागदपत्रे सोबत घेऊन वाहने चालवावी. शहरातून वाहनांची गती सौम्य ठेऊन कुणालाही याचा त्रास होणार नाही याची काळजी घावी. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी सर्वानी घ्यावी. तसेच पालकांनी लहान मुलांना वाहने देऊ नये, टवाळखोऱ्या करणार्यांनी आपल्या वागण्यात सुधारणा करावी आणि ट्रिपल सीट, धूम स्टाईलने वाहन चालवून इतरांना त्रास देऊन नये. असे आढळून आल्यास त्याच्यावर कडक कार्यवाही केली जाईल, कुणाचीही शिफारस आली तरी चुकीने वागणाऱ्या कोनचीच गैर केली जाणार नाही. आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवात कोणतेही गालबोट लागू नये. तसेच महिला - मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी जागरूकता दाखवून टवाळखोऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी लवकरच बसस्थानक परिसरात पोलीस चौकी स्थापण केली जाईल अशी माहिती असेहि पोलीस निरीक्षक भुसनर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी