नविन नांदेड। युपीएससी मध्ये धवधवित यश संपादन करणा-या शिवहार पाटील मोरे यांच्ये बाभुळगाव ग्रामस्थांचा वतीने फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये उत्साहात स्वागत केले यावेळी गावातील अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी स्वागत केले.
बाभुळगाव ता.जि. नांदेड येथील चक्रधर मोरे यांच्ये चिरंजीव असलेल्या शिवहार मोरे यांनी गत वर्षी युपीएससी मध्ये ६४९ व्या स्थानी घवघवीत यश संपादन केले होते,तर यावर्षी ४०९स्थानी यश संपादन केल्या बद्दल बाभुळगाव ग्रामस्थांचा वतीने १३ जुंन रोजी आगमन निमित्ताने गावकऱ्यांनी ढोलताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जल्लोष पुर्ण वातावरण मध्ये स्वागत केले या वेळी प्रांरभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आल्या नंतर गावातील हनुमान मंदिर,दत, कृष्ण मंदिर देवस्थान येथे दर्शन घेतले यावेळी गावातील अनेक कुटुंबातील जेष्ठ नागरिक, महिला ,युवक यांनी अभिनंदन करुन स्वागत केले.
ग्रामपंचायत कार्यालय बाभुळगाव यांच्या वतीने संरपच पुंडलिक मस्के, व ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वागत केले तर , माजी संरपच आंनद गिरी,माजी चेअरमन प्रभाकर मोरे, विश्वनाथ मस्के,माधव मोरे, संभाजी मस्के,चक्रधर मस्के,जयद्रथ मोरे,माधव मस्के, भगवान मस्के, नागोराव मस्के, भगवान मस्के, सुर्यभान मोरे , संजय मोरे, राजेश मोरे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक मोरे,माणिका मस्के,दता बोडके, नामदेव बोडके,धोंडीबा बोडके, रामजी पाटील मस्के,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यापुर्वी गावातील अनेक युवक शिक्षण क्षेत्रात आघाडी घेऊन विविध पदांवर कार्यरत आहेत,तर युपीएससी मध्ये शिवहार मोरे पाटील यांनी केलेल्या यशा मुळे पुन्हा बाभुळगाव चे नाव देशात अव्वलस्थानी आल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी हे नांदेडला असताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल व मार्गदर्शन घेत बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी व्हावयाचा ठरवले होते, सुरूवातीला काळांत विद्यार्थीनींनी अपयशाला न घाबरता यश मिळवयाचे ठरवले होते व जिद्द उराशी बाळगून हे यश मिळवले असल्याचे सांगितले.