हिमायतनगर। देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या कार्यकाळास ८ वर्ष यशस्वी पूर्तीबद्दल युवा मोर्चा नांदेड ग्रामीण तर्फे आयोजित 13 जून 2022 रोजी युवकांची दुचाकी रॅली काढून शहरवासीयांचे लक्ष वेधले होते.
नांदेड जिल्ह्याचे भाजपचे लोकप्रिय खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्ह्यातील ग्रामीण अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या सूचनेने युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज हिमायतनगर शहरांतील मुख्य रस्त्याने मोर्चाच्या विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
याची सुरुवात हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग१६१ए वर असलेल्या श्री परमेश्वर मंदिर कमानी समोर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ही मोटर सायकल रॅली ग्रामदैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन शहरांमध्ये प्रस्थान करण्यात आली. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरीब लोकांसाठी लोक कल्याणकारी योजना विविध सामाजिक योजने बदल तळागाळातील लोकांपर्यंत माहिती देण्याच्या उद्देशाने विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष खंडु चव्हाण, सुधाकर पाटील सोनारिकर किशनराव वानखेडे, सी एन कदम, ज्ञानेश्वर पंदलवाड, सुभाष माने, ज्ञानेश्वर शेवाळे, जीवन जयस्वाल, संजय गोसलवाड, परमेश्वर सूर्यवंशी, बालाजी ढोणे, बाळु ढोणे, सुरज चिंतावार, वामन पाटील मिराशे, अजय सुंकुलवार , कल्याण सिंग ठाकूर, तुकाराम कोमलवाड, प्रकाश जाधव, सदा महाराज, प्रकाश सेवनकर, अनिल जाधव, अनिल माने, बाळा खंदारे, बापू जाधव, गणेश जाधव, रुपेश भुसावळ, रामेश्वर पाकलवाड, महेश काळे, प्रशांत ढोले, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.