नांदेड| सलग विसाव्या वर्षी चालण्याच्या भव्य स्पर्धांचे रविवार दि.२६ जुन २०२२ रोजी सकाळी ६ वाजता श्रीराम सेतु पुल, गोवर्धन घाट,नांदेड येथे आयोजन करण्यात आले असून माध्यम प्रतिनिधी सह विविध नऊ गटातील विजेत्यांना कच्छवेज गुरुकुल तर्फे आकर्षक मोबाईल मिळणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
भाजपा महानगर नांदेड, अमरनाथ यात्री संघ तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष अतिथी म्हणून नांदेड भूषण लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी, नांदेड भूषण सरदार नवनिहालसिंघ जहागीरदार, नांदेड भूषण ॲड. मिलिंद एकताटे, नांदेड भूषण डॉ. हंसराज वैद्य हे उपस्थित राहणार आहेत. अमरनाथ यात्रेला दरवर्षी हजारो भाविक जातात.अत्यंत अवघड असलेली यात्रा सुलभ व्हावी. यासाठी अमरनाथ यात्री संघ नांदेड तर्फे दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमीत चालण्याचा व प्राणायाम चा सराव चार महिने केला जातो.
अश्या प्रकारे यात्रेची पूर्वतयारी फक्त नांदेड येथेच करण्यात येत असल्यामुळे यात्रेकरूंची प्रकृती उत्तम राहते.आरोग्या विषयी जागरूकता निर्माण व्हावी व नागरिकांना चालण्याची सवय लागावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते .सर्वांसाठी ही स्पर्धा खुली व निशुल्क आहे.प्रत्येक स्पर्धकाला दोन किमी अंतर चालायचे आहे.४१ ते ६० वयोगटातील पुरुष,१ ते ६० वयोगटातील महिला,६० वर्षावरील पुरुष,६० वर्षावरील महिला,पुरुष अमरनाथ यात्री,महिला अमरनाथ यात्री, खुला गट पुरुष, खुला गट महिला, तसेच या स्पर्धेची माहिती संपूर्ण भारतात करणाऱ्या माध्यम प्रतिनिधीचा स्वतंत्र गट अश्या ९ गटामध्ये या स्पर्धा होणार आहे.
प्रत्येक गटातील विजेत्यांना कच्छवेज गुरुकुल तर्फे आकर्षक मोबाईल देण्यात येणार आहे. या शिवाय प्रत्येक गटातील पहिल्या तिघांना नांदेड जिल्हा टेंट व मंगल कार्यालय असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहेत. पाऊस सुरू असला तरी ही स्पर्धा होणार आहे. इच्छूकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक नसून स्पर्धकांनी रविवारी सकाळी पावणे सहा वाजेपर्यंत थेट श्रीराम सेतु, गोवर्धन घाट येथे पोंहचावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष व लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.