नांदेड| दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे संचालक डाॅ. विजय लाड संकलित "श्री शिव समर्थः सौहार्द्रपूर्ण संबंध" या पुस्तकाचे विमोचन दीप नगर येथिल हनुमान मंदिरामध्ये प्रा. डाॅ. दिपक कासराळीकर, अध्यक्ष शरद सोडेगावकर व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रभाकरराव कानडखेडकर यांचे हस्ते झाले.
महाराष्ट्रधर्म जागरण करण्यासाठी शिव समर्थांची विचारधारा आज देशाला गरजेची झाली आहे असे मत प्रा. कासराळीकर यांनी व्यक्त केले. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे महाराष्ट्राच्या जडण घडणीत एकमेकांबद्दल असलेला आदरयुक्त व परस्परपुरक प्रेमभाव डाॅ. विजय लाड यांनी अनेक प्रसंगातून कसा व्यक्त झाला आहे ते सर्व पुराव्यानिशी या पुस्तकात दिल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात शरद सोडेगावकर यांनी समाजमनातील संशय व भ्रम दुर होण्यासाठी अशा साहित्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन सौ. रेणूका देऊळगावकर यांनी तर आभार प्रकटीकरण सौ. कांचन पाठक यांनी केले. तीन श्लोक, जपमाळ व स्वागत गीत सौ. मंजिरी जोशी यांनी सादर केले. कल्याणकरी रामराया ही प्रार्थना सुषमा माढेकर यांनी गायीली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश जोशी, बाळासाहेब पानसे, लक्ष्मीकांत गुंटूरकर, शुभंकर कोंडलवाडीकर, तेजस लाड, पांडुरंग जिरेवार यांनी परिश्रम घेतले.