लोहा| कोरोना काळात खंडित झालेली दिंडी आता विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरीकडे निघाल्या आहेत. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या साधू महाराज दिंडीचे प्रस्थान लातूर जिल्ह्याकडे होत असतात. प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर कुटुंबियांनी माळेगाव यात्रा येथे दिंडीचे स्वागत केले.साधू संतांच्या सेवेमुळे पांडूरंग पावतो. पांडुरंगाच्या आशीर्वाद सदैव पाठीशी असावेत असे प्रतिपादन युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले.
मागील दोन वर्ष कोरोना काळात खंडित दिंडी आता पुन्हा सुरू झाली. साधू महाराज दिंडीचे दरवर्षी प्रमाणे यंदाही चिखलीकर कुटुंबियांनी माळेगावात दिंडीचे स्वागत केले श्री साधू महाराज संस्थानाच्या दिंडीचे नांदेड -लातूर सीमेवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. साधू महाराज संस्थानाच्या दिंडीचे प्रमुख हभप एकनाथ महाराज ,हभप ज्ञानेश्वर महाराज, गुरुमाय, जनामाय, लक्ष्मीबाई व वारकरी संप्रदायाचे स्वागत करण्यात आले.
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई चिखलीकर, जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी पं. स. सदस्य बालाजी राठोड, माजी उपसभापती रोहीत पाटील,आंडगेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रमुनी मस्के, भाजपाचे नांदेड दक्षिण चे तालुकाध्यक्ष सुनील मोरे, विजय वाघमारे, नामदेव पाटील पवार (काकाजी) गणपत तिडके, अंबादास जहागिरदार, वैजनाथ पवार,बाळू बाबर, माऊली पाटील, सुर्यकांत गायकवाड, नारायण भोसीकर हनमंत धुळगुंडे, केरबा पाटील, संदीप कागणे, बापू सावकार बनवसकर आदि उपस्थित होते. प्रविण पाटील चिखलीकर यांनी दिंडीतील समस्या अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा असे सांगून संत वारकरी याना वंदन केले साधू संतांचे आशीर्वाद नेहमी पाठीशी असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.