नांदेड| दिनांक 23 जून. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड ओलंपिक असोसिएशन नांदेड नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेडच्या वतीने आयोजित सुदृढ भारत मशाल रॅलीला नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
सदरील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे विभागीय प्रमुख शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गोपीले जिम्नास्टिक संघटना अध्यक्ष डॉ. अंकुश देवसरकर जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार सहाय्यक उपायुक्त स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, अवतारसिंग रामगडिया राजुरी स्टीलचे विशाल मुधोळकर ,विक्रांत खेडकर ,शिवकांता देशमुख रमण बैनवाड, वृषाली पाटील जोगदंड प्राध्यापक जयपाल रेड्डी ,बाबुराव खंदारे ,प्रणिता रेड्डी ,एकनाथ एकनाथ पाटील, किशोर पाठक ज्ञानेश्वर सोनसळे ,सारंग सिंह परिहार प्रलोभ कुलकर्णी शिवकांता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील ऑलम्पिक ची सुरुवात आंतरराष्ट्रीय खेळाडू लता उमरेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रायोजक राजुरी स्टीलचे कैलास लोया अर्जुन दमाम ,राजू शिंदे , कठारे , तला शेठ , राहुल देशमुख गोविंद मुळे आदिनाथ बारगजे यांनी तसेच जिल्हा संघटनेचे सचिव सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. जुना मोंढा येथील सुरुवात झालेल्या रॅलीची सांगता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे राजेश्वर मारावार यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यांचे प्रास्ताविक ऑलिम्पिक संघटना सचिव मास्टर बालाजी पाटील जोगदंड यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव डॉ. राहुल वाघमारे व डॉ. दिनकर हंबर्डे यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी आपले विचार प्रकट करताना प्राध्यापक जयपाल रेड्डी यांनी ऑलम्पिक दिनाचे महत्त्व विषद केले तर जनार्दन गुपीले यांनी ऑलम्पिक दिन कशासाठी साजरा केला जातो त्याचे महत्त्व सांगितले. वृषाली पाटील जोगदंड यांनी महिला ऑलम्पिक मध्ये काय करू शकतात तसेच नांदेड जिल्हा धनुर्विधा ऑलिंपिकमध्ये पहिलं पदक नक्की देऊ शकेल यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तर ऑलम्पिक रॅलीमध्ये नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे संघटना कोषाध्यक्ष जयपाल रेड्डी यांनी सांगितले तसेच सप्ताहातील सर्वच कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑलिम्पिक संघटना अध्यक्ष रमेश पारे सचिव बालाजी पाटील जोगदंड ,प्रशांत वावधाने, ऋषिकेश टाक शिवाजी कदम विजय सोंडारे, कैवल्य पुजारी सौंदर्या उमरे , आकाश बगाटे, सिंधू चावरे , ज्ञानेश्वर सोनसले, निलेश खराटे , अतुल गोड बोले , याच्या सह मोठ्या प्रमाणात खेळाडूनी सहभाग नोदविला.