नायगाव, दिगंबर मुदखेडे| नायगाव तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथील तालुकासह संबंध जिल्ह्यामध्ये एक कलाकाराच गाव म्हणून प्रसिद्ध आहे विविध प्रकारच्या कला आणि कलागुणांना वाव देत विविध क्षेत्रांमध्ये विविध कार्य करणारे कलाकार या जन्मी भूमीमध्ये जन्माला आले आहेत. त्यात प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विविध कला असतात कुरेशी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कलागुणांना वाव घेतो तर कुणी शेती क्षेत्रामध्ये कलागुण अवघे त्यामध्येच एक शेतकरी म्हणून ज्यांना जिल्हा कृषी पुरस्कार प्रदान झाला. ते संतोष गंगाधर देशमुख यांनी विविध विषयावर दरवर्षी चर्चासत्र करून विविध कंपनीच्या लोकांना गावांमध्ये बोलून शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये कंपनी विषय व पिकांविषयी विविध मराठी वापरून चांगल्या प्रकारचे उत्पादन देणाऱ्या कंपनीची निवड करून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा कशा पद्धतीने मिळेल यावर मार्गदर्शन करतात.
त्या कंपनी कडून बियाण्याची हमी घेऊन चांगल्या प्रकारचे बियाणी शेतीमध्ये वापरत आणि निघालेला माल त्यांनी स्वतः चांगल्या बाजारपेठेमध्ये घेऊन विक्री करत गावातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या आर्थिक फायदा मिळवून देण्याचे काम करत असताना दिसून येते. गतवर्षी इसवी सन 2021 मध्ये खरीप हंगामामध्ये सिजेंटा इंडिया कंपनी च्या माध्यमातून पीक संरक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता त्यामध्ये त्या कार्यक्रमाच्या अवलंब करत दर्जेदार व आर्थिक उत्पादन प्राप्त करून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा फायदा मिळवून देण्याचे काम कर होते.
जवळील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे सकळाशी मार्गदर्शन करत दर्जेदार व अधिक उत्पादन प्राप्त करून देत विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्यांच्या दर्जेदार व अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करत असत त्यांच्या कार्याची दखल घेऊन सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी संतोष गंगाधर देशमुख यांना विभागीय शेतकरी सन्मान पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
दिनांक 7 मे 2022 रोजी शेतकरी सन्मान कार्यक्रम सोहळा संपन्न झाला त्यामध्ये.शैलेश इंदुलकर विभागीय प्रबंधक, तुकाराम आवटी विभागीय विपणन प्रबंधक ,इंद्रजीत थोरात क्षेत्रीय प्रबंधक नांदेड 1 ,अजित देशमुख क्षेत्रीय प्रबंधक नांदेड 2 ,सोमनाथ शेळके क्षेत्रीय प्रबंधक लातूर, शिवराज राणी क्षेत्रीय प्रबंध हिंगोली, पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली दिनांक 07 मे 2022 रोजी हॉटेल पद्मावती ग्रँड मालेगाव रोड नांदेड वार शनिवार सकाळीं 10:00 वाजता संतोष गंगाधरराव देशमुख यांना सन्मानपत्र फेटा व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचा मिळालेल्या पुरस्काराबद्दल गावकरी व नायगाव तालुक्यातील सबंध शेतकरी यांच्या वतीने जिल्हा कृषीनिष्ट शेतकरी संतोष गंगाधर देशमुख यांचे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आहे .त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्व गावकरी प्रतिष्ठित व्यापारी शेतकरी वर्गातून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले आहे.