खा चिखलीकर यांच्या उपस्थितीत कोरोनावीरांचा सत्कार
नायगाव, दिगंबर मुदखेडे| वै.ह.भ.प. मुरलीधर श्रीधर महाराज रामदासी महाराज शेळगावकर यांचा प्रथम पुण्यस्मरणा निमित्त दि.9 मे सोमवारी शेळगाव गौरी येथे आठवण सोहळा मुरलीधर महाराजाचा , गजर कीर्तनाचा या सह सामाजिक उपक्रमाने पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भक्त गणांनी लाभ घेण्याचे आवाहन रामदासी परिवार व ग्रामस्थ शेळगाव गौरी यांनी केले आहे.
सकाळी ११ते दुपारी २ पर्यंत वैदयीक कार्यक्रम,रात्री ७ ते ९ मराठवाड्यातील प्रसिध्द किर्तनकार विनोदाचार्य,ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाठकरयांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.या वेळी प्रसिद्ध मृदंग वादक विश्वेशवर जोशी,तबलासाथ हरिप्रसाद पांडे,शिवाय गायनाचार्य हावगी पनासे,रमेश जाधव,विष्णू तांदळी कर,साईनाथ जाधव,बालाजी चौधरी, नामदेव पांचाळ,शँकर बिरादार,माधव किन्हाळकर, व भोपळा,टाकळी, धुपा,शेळगाव येथील भजनी मंडळी साथ करणार आहेत.
या निमित्त खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते शेळगाव येथील कोरोनावीरांचा सत्कारआयोजित केला आहे. शिवाय मुरलीधर रामदासी यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावचे सरपंच याना समस्थ ग्रामस्थ यांच्या उपयोगी वस्तू देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी नंदकुमार मुरलीधर रामदासी ,आनंत मुरलीधर रामदासी,दिलीप मुरलीधर रामदासी,सुनील मुरलीधर रामदासी,शाहजी मुरलीधर रामदासी, या सह,संतोष देशमुख, सुनिल देसाई, प्रज्योत कुलकर्णी, राजेश सुल्लेवाड, प्रकाश शिंपाळे हे प्रयत्न करीत आहेत.