भोकर| आजादी का अमृत महोत्सव वर्षा निमित्त केंद्र शासनाच्या सुचनेवरुन तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दि. २२ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले असल्याने भोकर तालुक्यातील गरजू नागरिकांनी व रुग्णांनी या आरोग्य मेळाव्यात आपली आरोग्यची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन डॉ. अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर व डॉ राहुल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांनी केले आहे.
आरोग्य मेळाव्यात फिजीशियन, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, दंतशल्य चिकित्सक या तज्ञांच्या सेवा उपलब्ध होणार आहेत . तसेच आयुर्वेद, युनानी, होमिओपथी या तज्ञांच्या सेवा व आरोग्य विषयक मार्गदर्शन लाभणार आहे. रक्तदान शिबिर सुध्दा आयोजित केले आहे. हेल्थ वेलनेस, अँक्टीव्हीटी, योगा, मेडीटेशन तसेच रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधा व शासकीय आर्थिक लाभ या बद्दल माहिती दिली जाणार आहे.
त्याच बरोबर डिजिटल हेल्थ आयडी तयार केली जाईल. आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तयार करुन मिळतील. एनसीडी स्क्रिनिंगमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, ऱ्हदय रोग ईत्यादी आजाराचे निदान व उपचार केले जाणार आहेत. दंत शल्यचिकित्सक यांच्या सेवा उपलब्ध करून मौखिक आरोग्य व कर्करोगाचे निदान करून सेवा देण्यात येणार आहे. गरजू रुग्णांच्या विविध प्रकारच्या रक्त व लघवी तपासण्या केल्या जाणार असल्याने जनतेने याचा लाभ घेण्याचे असे आवाहन आरोग्य विभाग तर्फे करण्यात आले आहे.
आरोग्य मेळाव्याची पुर्व तयारी आढावा बैठक दि.१८ रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे घेण्यात आली. भोकर तालुक्यातील भोसी,किनी व मोघाळी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य मेळावाचा लाभ घेण्या बाबत माहिती दिली.
यावेळी डॉ. राजाराम कोळेकर दंत चिकित्सक, डॉ व्यंकटेश निलेवार वैद्यकीय अधिकारी मोघाळी, डॉ उमेश जाधव, डॉ जगदीश राठोड, डॉ प्रणिता राहटीकर, डॉ अर्चना गिरी, डॉ. विप्रमा पवार, डॉ शितल सोनटक्के, डॉ रजंना तोटेवाड, डॉ एकबाल, डॉ गजानन डाकोरे, डॉ तिरुपती गनुवाड, डॉ चिटकुलवार, डॉ गजानन कोलपवार समुदाय आरोग्य अधिकारी, डॉ व्यंकटेश टाकळकर.
डॉ अविनाश गुंडाळे, डॉ थोरवट, डॉ अपर्णा जोशी, डॉ ज्योती संगेवार, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, श्रीमती ब्राम्हणे अधिपरीचारीका, बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, अत्रीनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, सय्यद एम ऐ आरोग्य सहाय्यक, संजय देशमुख सहाय्यक अधिक्षक, साबेर पाशा लिपिक, संदिप ठाकूर, गिरी रावलोड, मल्हार मोरे औषध निर्माण अधिकारी, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, सुरेश डुम्मलवाड समुपदेशक, सुधाकर गंगातीरे आरोग्य मित्र आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.