मानवाच्या आध्यात्मिक विकासाबरोबर संगीताचा विकास होत गेला - रमेश मेगदे-NNL

सुप्रभात मध्ये रंगली सांगीतिक महाशिवरात्री पूर्वसंध्या


मुखेड, दादाराव आगलावे।
संगीतकला ही सांस्कृतीक ऊर्जा देणारी बाब आहे. मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांच्या माध्यमातून या शहरातील अनेक कलाकारांना सांगीतिक व्यासपीठ मिळाले आहे. भारतीय संगीतकला आदर्श असून तिची जपणूक करण्याची गरज आहे. नव्या पिढीने गायनाकडे वळण्याची गरज नाहे. मानवाच्या आध्यात्मिक विकासाबरोबर संगीताचा विकास होत गेला असे प्रतिपादन मेडिसिन फार्मा नांदेडचे संचालक तथा प्रशिद्ध गायक रमेश मेगदे यांनी केले.

सुप्रभात मित्र मंडळाच्या वतीने कोत्तावार ऑइल मिल येथे नुकताच महाशिवरात्री पूर्वसंध्या सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी मेगदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. एस.एन. कोडगिरे होते तर मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे, सचिन देशपांडे, डॉ. आर. जी. स्वामी, डॉ. एम.जे.इंगोले, डॉ. विरभद्र हिमगीरे, नंदकुमार मडगुलवार, उत्तम अण्णा चौधरी, डॉ. शिवानंद स्वामी यांची प्रमुख उपस्थिती. प्रारंभी रमेश मेगदे यांनी लाल पथ्थर या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या आवाजातील, गीत गाता हूँ मैं... गुनगुनाता हूँ मैं... हे गीत गाऊन श्रोत्यांना संगीताच्या दुनियेत घेऊन गेले. 

संगीताच्या निर्मितीबाबत अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु त्यापेक्षा आदिकाळापासून ते आजपर्यंतच्या काळापर्यंत संगीताचा विकास कसा झाला हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल असे सांगत काजल या चित्रपटातील, लेने दो नाज़ुक होंठों को...कुछ और नहीं हैं जाम हैं ये... हे  गीतकार साहिर लुधियानवी यांचे मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यानंतर प्यार ही प्यार या चित्रपटातील गीतकार  हसरत जयपुरी यांचे मोहम्मद रफ़ी यांच्या आवाजातील, मैं कहीं कवि न बन जाऊँ... तेरे प्यार में ऐ कविता...  हे गीत गाऊन प्रेक्षकांना आपला जुना काळ आठवण्यास भाग पाडले. 

अगर तुम ना होते या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या आवाजातील, गीतकार  गुलशन बावरा यांचे, हमें और जीने की... चाहत न होती... अगर तुम न होते... हे गीत गाऊन रमेश मेगदे यांनी श्रोत्यांना टाळ्यांची दाद देण्यास भाग पाडले. यानंतर तीसरी कसमया चित्रपटातील, शैलेन्द्र यांचे, सजन रे झूठ मत बोलो... खुदा के पास जाना है... हे गीत गाऊन भक्तीमय वातावरण बनविले. शेवटी मेरा नाम जोकर या चित्रपटातील संगीतकार जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले मुकेश यांचे, जिना यहा... मरणा यहा... इसके सीवा... जाना कहा... हे गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. 

कार्यक्रमाचे निवेदन दादाराव आगलावे यांनी केले तर सुप्रभात चे संघटक अशोक कोत्तावार यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, सचिव जिवन कवटीकवार, संघटक अशोक कोत्तावार, सुर्यनारायण कवटीकवार, गोपाळ पत्तेवार, नारायणराव बिलोलीकर, सूर्यकांत कपाळे, मनोज जाजू, लक्ष्मीकांत चौधरी, प्रवीण कवटीकवार, बालाजी वट्टमवार, शिवाजी कोनापुरे, उत्तम भाऊ कुलकर्णी, सचिन देबडवार, बालाजी डोनगाये, व्यंकट शिंदे, राम जाधव, भास्कर इंगोले, दिनेश देव्हारे, श्रीनिवास येवतीकर यांच्यासह मोठ्या संख्येने श्रोतागण उपस्थित होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी