संघर्ष व आडचणीशी यशस्वी मात करणार व्यक्तीमत्व म्हणजे प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे सर-NNL

महाराष्ट्रातील आदर्श गांव शेळगांव (गौरी) चे सरपंच तथा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालय मुखेडचे प्राचार्य डाँ.मनोहर जळबा तोटरे सर यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील संघर्ष व आडचणीवर मात करुण यशस्वी सामाजिक,राजकीय.शैक्षणिक  कार्याचा आढावा.

माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य  जगतो. पण.. आयुष्यात नशीबी संघर्ष व आडचणीवर कशी मात करतो.आपण कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो हाच जिवणातील महत्वपुर्ण मुलमंत्र समजतो.

अंगमेहनतिचीही कामे कशी लोक करतात.  आयुष्य जगायचं तर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व स्वतः निर्माण करायचे व इत्तरानी मात्र आपल्या आयुष्यात आडचणी  निर्माण करुण आपल अस्तित्व कायमचंच संपुष्टात आणण्यासाठी आडचणी निर्माण करायचे आपण कितीही चांगले असलो तरी सुद्धा पावलोपावली जिवणात संघर्ष व आडचणी निर्माण होत आसताना आपण कसे जगलो अहोत हे काळ ठरवत आसतो. केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी व माझं कुटुंब एवढंच जग नसतं आपलं जिवण दिनदुबळ्याच्या व समाजाच्या उपयोगात आल पाहिजे.

प्राचार्य डाँ,मनोहर तोटरे सर व माझे संबंध आगदी बालपणापासुन पण मनोहर तोटरे सर यांच्या जिवणात खुप संघर्ष.आडचणी आल्या आगदी बालपणात सर्व कौटुंबिक जवाबदारी आईने कष्टाने दोन मुली व दोन मुले आसा 5 जनांनचा परिवार चालवला नव्हे  दोन्ही मुलींचे लग्न मुलांचे शिक्षण सुध्दा आईने केले.मनोहर तोटरे सर यांच्या शैक्षणिक वाटचालीत आनेकानी मार्गदर्शन केले व आज प्राचार्य पदावर विराजमान झालेले आहेत तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रांतसुद्धा एक वेगळी छाया निर्माण केली आहे.  

जगावं तर ते समाजासाठी...  तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता ? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात... करियर म्हणजे आजकाल केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार झाला आहे... समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आपल आयुष्य आसत हे प्राचार्य  डाँ,मनोहर तोटरे सर यांच्याकंडे पाहुण दिसंत.

खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो.  पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आसतात... यातील एकही वस्तू कायम आपल्या  सोबत राहु शकत नाही.फक्त आपले कर्म, समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते.

आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही... पण समाजासाठी झटणारे साधु संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरण घ्यायचच झाल तर  संत  गाडगेबाबा महाराज... काय होते त्यांच्याकडे... फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा...पैश्याचा तर विषयच नव्हता...चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले.

प्रत्येकाला समाजात असं काही करतो येते का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने आसा इतिहास शेळगांव (गौरी) ता,नायगांव या गावातील आनेक दिवसापासूनचा ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व समाजातील लोकांची विश्वासार्हता संपादन करुण ग्रामपंचायत कार्यालयावर सत्ता निर्माण करणे सोपे नव्हते पण ते मनोहर तोटरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास पँनलला मिळालेले यश म्हणजे खुप मोठी व आश्चर्यचकित बाब आहे.

मनोहर तोटरे हे राग, द्वेष न करता आयुष्यात आलेल्या वाईट प्रसंगातुन चांगल्या गोष्टी  निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.बालपणासारखंच आपल आयुष्य राहिल असंही नाही. आपल्यावर कुटुंबाची व समाजसेवा करताना हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात.समाजासाठी जगताना...दान-धर्म करणे, योग प्राणायम करणे,भुकेल्या माणसांना अन्न देणे. आनंदात जगणे हेच जिवणाच मुलमंत्र आहे.

एक अभ्यासू शिक्षक.समाजसेवक व राजकारणातील महत्वपुर्ण आसे सरपंच पद सार्थ पणे चालवत आहेत म्हणून आयुष्यातील सर्व संघर्ष व आडचणीवर मात करुण यशस्वी कार्य करण्यार्या बालमित्रास तथा सरपंच  प्राचार्य डाँ,मनोहर तोटरे सर याना वाढदिवसाच्या मनःपूर्वक खुप-खुप शुभेच्छा.

.....सुनिल रामदासी, नांदेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी