स्थानिक पोलीस प्रशासन दारुबंदी विभागाच्या थातुरमातुर कार्यवाही..
अवैध दारू विक्रेत्यांचा व दारूबंदी पोलिस, स्थानिक पोलीस प्रशासनाचा मोठ संपर्कात असल्याने "तु मारल्या सारखं कर,मि रडल्या सारखं करतो."
तालुक्यातील गावागावात देशी - विदेशी हातभट्टी दारू तसेच सिंधी व बनावट दारूच्या महापुराची दारूबंदी विभागास आणी स्थानिक पोलिस प्रशासनास याबाबत सविस्तर माहिती असुन देखील मोठी कार्यवाही करतांना दिसत नाहीत. मुखेड तालुका हा अवैध धंद्याचा माहेर घर अशी ओळखच निर्माण झाली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दुय्यम कार्यालयाचे कर्मचारी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर मोठी कार्यवाही न करता थातुरमातुर करिता असल्याने सुजान नागरिकातुन मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुखेड तालुक्यातील जवळपास ७० ते ८० गावामध्ये सहजरीत्या भर चौकामध्ये अवैध देशी गावठी विदेशी दारू उपलब्ध होत आहे. याबाबत दारूबंदी विभागाला देगलुर व मुखेड पोलिस महसूल विभागाला सविस्तर माहिती असतानांही प्रशासनाने चक्क झोपेच सोंग घेत आहे.
या अवैध व बनावट दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. परिसरातील नवयुग विद्यार्थ्यांना सहजरीत्या मिळणाऱ्या दारूच्या घोटाची चटक लागली आहे. यामुळे नव पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. मुखेड शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी दारू पिऊन या दारूड्यांनी हाणामारी - धिंगाणा घालत असल्याने तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्यातील या अवैध दारू विक्रेत्यांवर जिल्हाधिकारी व मा.पोलिस अधीक्षकांनी मोठी कार्यवाही करूण अवैध दारू अड्डे नेस्तनाबुद करावेत अशी मागणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यां, युवक,विद्यार्थी आणी प्रतिष्ठित नागरिकांतुन केली जात आहे.