शहिद भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले
मुखेड, रणजित जामखेडकर| शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शहीद दिवस साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे, व्याख्याते प्रा.डॉ. किर्तिरत्न हातोडे, प्रा.डॉ. संतोष शेंबाळे, व्यासपीठावर अधिक्षक एस.के.सुर्यवंशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सी.एन.एकलारे, आभार प्रदर्शन प्रा.एस. पी.अग्रवाल, प्रास्ताविक प्रा.डॉ. जी.वाय.कहाळेकर यांनी केले. वाणिज्य विभागातील प्रा.सुरेश भोयवारे यांची मराठवाडा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. अडकिणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील गरीब होतकरू मुलांच्या हाताला काम उपलब्ध करून देऊन व त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रयत्न करीत रहावं असा मनोदय व्यक्त केले .
व्याख्याते डॉ. हातोडे यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवनातील विविध घडामोडींचा मागोवा घेत त्यांच्या बलिदानाचे वीरस्मरण करत प्रकाश टाकला . डॉ. शेंबाळे यांच्या भाषणात शहीद भगतसिंग , राजगुरू , सुखदेव यांनी देशाला स्वातंत्र्य , हक्क मिळवून देण्यासाठी हसतमुखाने बलिदान दिले हे विसरून चालणार नाही . आपल्या येणाऱ्या पिढीला शहीदांनी केलेल्या त्यागाची आठवण ठेवणे आवश्यक आहे . स्वतः ची जबाबदारी पार पाडण्यासाठी वीरांची शौर्यगाथा प्रेरणादायी ठरत असते असे विचार मांडले . अध्यक्षीय भाषणात समाज आज दिशाहीन होऊन जगत आहे . समाज आपल्या आयुष्यात शहीद भगतसिंग , राजगुरू व सुखदेव यांचे चिरस्मरण ठेवत वाटचाल करण्याविषयी मोलाचा सल्ला दिला .याप्रसंगी विद्यार्थी , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.