दिव्यांग मुल जन्मास येवू नये यासाठी जवळच्या नात्यातील विवाह टाळावा - डॉ. अनैता हेगडे -NNL


नांदेड|
दिव्यांग मुल जन्मास येवू नये यासाठी जवळच्या नात्यातील मुलामुलींचा विवाह टाळावा असे आवाहन बाल मस्तिष्करोग विशेषज्ञ डॉ. अनैता हेगडे यांनी केले आहे.

मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात शनिवार दिनांक २६ मार्च असे तीन दिवस मेंदूविकार रुग्णांसमवेत यावर्षी प्रथमच अस्थिव्यंग व हृदयविकार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ. अनैता हेगडे, डॉ. अशा चिटणीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

यावेळी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रकाश मालपाणी, कमल कोठारी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, अंकित अग्रवाल व मूख्याध्यापक नितीन निर्मल आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. अनैता हेगडे म्हणाल्या की विशेषतः ग्रामीण भागात जवळच्या नात्यातील मुलामुलींचा विवाह होतो. यातून दिव्यांग मुल जन्मण्याची शक्यता असते यासाठी शक्यतो नात्यातील मुलामुलींचा विवाह टाळावा तसेच अनुवंशिकतेतूनही दिव्यांग मुल जन्मास येवू शकते यासाठी महिला गरोदर असताना डॉक्टरांचा सल्ला, उपचार, सकस आहार आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

मेंदूशी संबंधित आजार बरे होणार नाहीत असा समज अनेकांचा असतो मात्र शून्य ते चार वयोगटातील बालकाच्या आजाराचे वेळीच उपचार केल्यास दिव्यांगही सामन्यासारखे जीवन व्यतीत करु शकतो. गत बारा वर्षात या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात आला याचा लाभ झाला असून शिबिराची सुरवात झाली त्यावेळीपासून सातत्याने शिबिरात उपचार घेणारे अनेक रुग्ण आता चालू लागले आहेत. अनेकांना दृष्टी प्राप्त झालेली आहे. यासाठी वेळीच उपचार केल्यास रुग्ण बरा होतो याबाबतची जनजागृती होणे गरजेचे आहे

या मुलांनाही सामान्य मुलांप्रमाणेच शिक्षणाचा हक्क मिळावा, त्यांच्याप्रमाणेच सर्व सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात ज्यामुळे दिव्यांग विद्यार्थीही भविष्यात स्वावलंबी होवून मुख्य प्रवाहात येतील असा विश्वास डॉ. अनैता हेगडे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर सह विविध मान्यवरांनी दिली आरोग्य शिबिरास भेट

येथील  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजीव एडके यांनी शुक्रवारी आरोग्य शिबिरास भेट देऊन याबाबतची माहिती घेतली. ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळत असल्याचे पाहून त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी