मुखेड, रणजित जामखेडकर| महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.अनिल भिकाने यांनी दि २४ मार्च २०२२ रोजी मुखेड येथील गोवर्धन गोसेवा केंद्र गोरक्षण संस्थेस भेट देवून संस्थेतर्फे करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या विकास कामांची पाहणी केली.
गोवर्धन गो सेवा केंद्र गोरक्षण संस्था मुखेड येथील संस्थेस गोवर्धन गो सेवा योजनेअंतर्गत शासनाने दिलेल्या एक कोटी रुपये निधी चा योग्य उपयोग करून संस्थेने उत्कृष्ट विकास कामे केली आहेत. विशेष म्हणजे संस्थेने विकसित केलेल्या आदर्श मुक्त संचार गोठा पद्धतीत येथील गाय- वासरे आनंदी व आरोग्यदायी जीवन जगत आहेत. त्यामुळे मुखेड शहरातील व परिसरातील शेतकऱ्यांनी गोरक्षण संस्थेमधील मुक्त संचार गोठा ही पद्धत आपल्या परिसरामध्ये अवलंबावी असे आवाहन यावेळी डॉ.अनिल भिकाने यांनी केले.
मुखेड गोरक्षण संस्थेचे भेटीदरम्यान संस्थेचे अध्यक्ष सत्यवान गरुडकर, सचिव वीरभद्र स्वामी,गोवर्धन गो सेवा केंद्राचे अधिकारी डॉ.राहुल कांबळे यांच्यावतीने डॉ.अनिल भिकाने यांचा नागपूर येथे माफसूच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.राहुल कांबळे म्हणाले की डॉ भिकाने हे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन खात्यामध्ये आम्हाला लाभलेल एक गुरुतुल्य व्यक्तीमत्व. त्यांची शेतकरी व पशुपालकां प्रतीची तळमळीमुळे ते आपला पूर्ण वेळ देवून गावोगावी जाऊन विविध शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतात.
माणूस शिक्षणाने मोठा असतो पण त्यांचं कर्तव्य त्याला यशाच्या शिखरावर नेत असते. त्याच माध्यमातून डॉ.अनील भिकाने सरांनी एवढे मोठे यश संपादन केले. डॉ.भिकाने यानी लातूर व परिसरातील जिल्ह्यात अनेक सुशिक्षित बेरोजगारांना त्यानी दूध व्यवसायाच्या माध्यमातून एक उद्योजक म्हणून दिशा दिली आणि त्यातून दूध उद्योजक तयार झाले. याच पद्धतीने आता ते नागपूर येथे कार्य करीत आहेत. गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष सत्यवान गरुडकर हे गेल्या २० वर्षापासून मुखेड येथे निस्वार्थपणे गोमातेचे संगोपनाचे अनमोल सामाजिक कार्य करत आहेत. त्यांचे मुळे मुखेड शहरातील गोवर्धन गो सेवा केंद्र हे एक आदर्श केद्रं होईल असे गौरवोद्गार डॉ भिकाने यानी काढले.
गोरक्षण संस्था,मुखेड येथील विकास कामाच्या पाहणी करतेवेळी त्यांनी आपला अमूल्य वेळ इथल्या गाई वासरां मध्ये घालवला व ते येथील गाई वासरांमध्ये रमून गेले. डॉ.अनिल भिकाने गेल्या पाच वर्षापासून गोरक्षण संस्थेच्या मुक्त संचार गोठा बांधणी तसेच आरोग्य व्यवस्थापन आदी कामासाठी आपला अमूल्य वेळ देवून सतत मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे सचिव तथा गोप्रेमी श्री विरभद्र स्वामी यानी गोरक्षण संस्थेच्या वतिने त्यांचे आभार मानले.