आत्माभिमान व स्वाभिमान जागृत ठेवणे ही सुद्धा एक मानवाची मूलभूत गरज-NNL

उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे यांचे प्रतिपादन, स्वाभिमानी मुप्टा स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतविणारी अग्रेसर संघटना 


नांदेड।
अन्न,वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु त्याशिवाय सुद्धा माणसाला माणूस म्हणून आयुष्य जगण्यासाठी आत्माभिमान आणि स्वाभिमान या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. या गोष्टी प्रत्येक माणसा जवळ जन्मजातच असतात यात वाद नाही. परंतु त्या कुठे सूप्त प्रमाणात तर कुठे जागृत असतात. स्वाभिमानी मुप्टा संघटना हेच स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतविण्यात अग्रेसर ठरली आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण नांदेड विभागाचे सहसंचालक डॉ.विठ्ठल मोरे यांनी केले. स्वाभिमानी मुप्टा संघटनेच्या संवाद परिषदेचे उद्घाटन डॉ.विठ्ठल मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

स्वाभिमानी महाराष्ट्र अडंर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.शंकर अंभोरे हे या संवाद परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. संवाद परिषदेच्या उद्घाटकीय भाषणात डॉ .विठ्ठल मोरे पुढे म्हणाले, मी सद्धा यापूर्वी संघटनेचा एक पदाधिकारी होतो. सघंटनेत काम करत असताना मुक्तपणे काम करता येतं.

परंतु शासनाचा प्रतिनिधी म्हणनू काही मर्यादांची जाणीव ठेवणे अपरिहार्य आहे. उच्च शिक्षण कार्यालयाच्या संदर्भाने संघटनेच्या मागण्या तसेच अडचणी लक्ष घालून आपण स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. अध्यक्षीय समारोपात प्रा.डॉ. शंकर अंभोरे यांनी जीवन जगत असताना संघटन किती महत्त्वाचे असते याविषयी उहापोह केला.

एकीचे आणि एकजुटीचे बळ खूप महत्त्वाचे असते. संघटने शिवाय तुम्ही जीवनातील कोणत्याही चढ-उतारांना एकटे -एकटे सामोरे जाऊ शकत नाही. स्वाभिमानी मुप्टा संघटना आज  मराठवाड्यात अतिशय ताकदीने उभी आहे,आपणा सर्वांचे या संघटनेला बळ मिळाले आहे. त्यामुळेच मराठवाड्यातील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना धसास लावणे आता शक्य होत आहे. आगामी काळात आपली संघटना सर्वांसाठी एक हक्काची शक्ती म्हणून उदयास येईल, असेही ते अध्यक्षीय समारोपात म्हणाले.

प्रारंभी विभागीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. बलभीम वाघमारे यांनी नांदेड येथे पार पडलेल्या संवाद परिषदेचे प्रास्तविक केले. संवाद परिषदेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कॅम्पस अध्यक्षा प्रो.डॉ.उषा सरोदे यांनी आपले विचार मांडले.

संघटना ही कार्यकर्त्यांसाठी एक ढाल बनून काम करत असते. त्यामुळे पुरुषांसोबतच स्वाभिमानी मुप्टा संघटनेमध्ये महिलांनी सुद्धा हे हिरीरीने भाग घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. संघटनेचे मार्गदर्शक प्रा.डॉ. ए.टी.सूर्यवंशी यांनी चळवळीला बदनाम करणाऱ्यांचा आपल्या घणाघाती भाषणात समाचार घेतला. प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस यांनी चळवळ ही जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे नमदू केले.

प्रा.डॉ.यु.टी. गायकवाड यांनी चळवळीत काम करत असताना येणाऱ्या अडचणीवर मात करून काम कसे केले पाहिजे, या बद्दल उद्बोधक मार्गदर्शन केले.  सघंटनेचे नेते प्रा.डॉ.भगवान गव्हाळे यांनी चळवळी शिवाय कुठल्याच कामाला तरणोपाय नसतो असे नमदू केले. स्वाभिमानी सघंटनेचे विभागीय अध्यक्ष प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी चळवळीच्या माध्यमातनू सोडवलेल्या प्रश्नांचा लेखाजोखा समोर ठेवला. सघंटनेचे सचिव प्रा.डॉ.विलास पांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना चळवळीची ध्येय आणि धोरणे विशद केली .

डॉ.सी.टी.कांबळे,डॉ.युवराज धबडगे,डॉ.बाळासाहेब लिहीणार , डॉ. प्रकाश वाघमारे, डॉ. अतुल चद्रंमोरे, डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. संगीता घुगे, डॉ. ज्ञानेश आझादे, डॉ राजेश कुंटूरकर आदींसह संवाद परिषदेला मराठवाड्यातील बहुसंख्य पदाधिकारी आणि सभासदांनी हजेरी लावली होती. संवाद परिषद यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ.शेख शहेनवाज बेगम, डॉ. शेख रजिया मॅडम यांनी परिश्रम घेतले. प्रा. डॉ. भारत कचरे यांनी संवाद परिषदेचे सूत्रसंचालन तर प्राडा अनिल गच्चे यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी