हिमायतनगर। आज दिनांक 01-03-2022 रोजी नांदेड जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सहविचार सभा हिमायतनगर येथे होऊन सर्वानुमते नूतन शिक्षकेत्तर कार्यकारणीची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्य उपप्राचार्य श्री डाके.एल.टी.सर व प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा सचिव श्री फाजगे सर, शहरअध्यक्ष श्री आर्दड सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री मोतेवार सर, जिल्हा सहकार्याध्यक्ष श्री कदम सर (अर्धापुर), श्री सोळंखे सर (किनवट), श्री ईनामदार सर (हिमायतनगर) व हिमायतगर तालुक्यातील बहुतांश शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी सेवानिव्रुत्त झालेले श्री रावते सर(लिपीक) व श्री मुधोळकर मामा(चतुर्थश्रेणी कर्मचारी) यांचा उचित सत्कार सुध्धा करण्यात आला.
नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे आहेत.. 1, श्री अशोक कगेवाड (अध्यक्ष) 2, श्री दिपक कदम (उपाध्यक्ष) 3, श्री सुरेश नारखेडे (सचिव) 4, श्री सुनील सुवर्णकार (कार्याध्यक्ष) 5, श्री मधुकर आयरवाड (सह सचिव ) 6, श्री गंगाधर कंदलवाड ( कोषाध्यक्ष ) 7, श्री राजु गाजेवार (संघटक) यांची निवड झाली.