अन्नदान, सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरी
सकाळी 10 वा.पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन जयंती मंडळाच्या अध्यक्षा आशा पंडित व माधवदादा जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तेव्हा या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण चे जिल्हा उपाध्यक्ष, रवि पंडित यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणुन अॅड.माधव हाटकर अध्यक्ष,अभिवक्ता संघ मुदखेड, प्रा.अशोक कुबडे, माधवदादा जमदाडे, मराठवाडा अध्यक्ष, रिपब्लिकन सेना,अॅड. कमलेश चैदंते नेते वंचित बहुजन आघाडी, अॅड.के.ए.पंडित अदिनी माता रमाई आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच तुप्पा, मंदाकिनी यन्नावार मधुकरदादा झगडे, वंचितचे नेते के.एच.वने,प्रकाश गजभारे, रंजनाबाई डोईबळे गवारेताई,हाटकरताई,गच्चेताई,उपस्थित होते.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाच्या अध्यक्षा आशा पंडित उपाध्यक्षा शोभाबाई बहादुरे जयश्रीबाई डोईबळे, सचिव छबुबाई पंडित,सहसचिव रमाबाई डोईबळे, रेखाताई डोईबळे,सिमाबाई पंडित, जोती पंडित, अरूणा डोईबळे,आदी व इतर महीलांनी परिश्रम घेतले. आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायक क्रांतीकुमार पंडित यांनी केले. तर आभार अशा पंडित यांनी मानले.