नांदेड। राष्ट्रीय कलाल ,गौड समाज युवा संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी मा.सुनील प्रभाकर अनंतवार तर महाराष्ट्र राज्य महासचिव पदी मा. नितीन प्रभाकर कन्नलवार यांची निवड करून राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
राष्ट्रीय कलाल गौड समाज युवा संघर्ष समितीचा राज्य मेळावा दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी पांढरकवडा याठिकाणी पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रीय नेते उपस्थित होते.राष्ट्रीय अध्यक्ष अमरवेणी नरसा गौड राष्ट्रीय महासचिव रगुला सिद्धी रामलु गौड ,तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष किरणकुमार गौड ,व बाबाराव देवलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुनील अनंतवार यांनी आपल्या मनोगतामध्ये येत्या काळात कलाल ,गौड समाजाचे हिताचे निर्णय घेऊन युवा पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.
महाराष्ट्रात कलाल गौड समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे पण तो विखुरलेला आहे येत्या काळात त्यांना एकत्र आणून संघटन बांधणी करून एक मोठा लढा उभारू असे ते म्हणाले, समाजातील सर्व तरुण-तरुणी उच्चशिक्षित असून समाजाचा आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळणार नसल्याचे मत व्यक्त केले.
महाराष्ट्रात कलाल गौड समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी नक्कीच युवा संघर्ष समितीचा फायदा होईल असे ते आपल्या मनोगतात म्हणाले.सुनील अनंतवार हे यापूर्वी अनेक राजकीय पक्ष,संघटनेमध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलेले असल्याने त्याचा फायदा समाजाच्या तरुण पिढीला, कलाल,गौड समाजाच्या उन्नतीसाठी व व्याप्तीसाठी नक्कीच होईल.या मेळाव्याला महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून कलाल ,गौड समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नवीन कार्यकारणी मध्ये राष्ट्रीय कलाल,गौड समाज युवा संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी माननीय सुनील अनंतवार महासचिवपदी नितीन कन्नलवार यांची निवड करण्यात आली असून राज्य उपाध्यक्षपदी संदीप गौड कोंडलवार,मराठवाडा अध्यक्ष पदी बालाजी घंटलवार ,मराठवाडा सचिव पदी धनंजय कन्नलवार मराठवाडा उपाध्यक्षपदी नागनाथ कुंडलवार ,व अविनाश पाळेकर यांची निवड करण्यात आली.
तर नांदेड जिल्हा अध्यक्षपदी सुमित गोडसे,सचिवपदी शंकर रायपलवार, परभणी जिल्हा अध्यक्षपदी नागेश बुरेवार, जालना जिल्हाध्यक्षपदी शिवाजी इबितवार ,औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी मयूर नातेवार, गोंदिया जिल्हा अध्यक्षपदी रमेश शिलेवार ,लातूर जिल्हा अध्यक्षपदी तानाजी तेलंग ,भंडारा जिल्हा अध्यक्ष पदी महेश कोत्तापल्लेवार यांची एक मताने निवड करण्यात आली.
या मेळाव्याला नांदेड व इतर जिल्ह्यातील प्रमुख पाहुणे म्हणून प्रामुख्याने गोविंद पाटील,दामोदर मंडलवार, विष्णू पडलवार, पांडुरंग पाटील, दत्तात्रय आनंतवार, उज्ज्वला पडलवार ,गजानन बुरेवार,बाबाराव नंदेवार ,विलास होलगीरवार, गंगाधर नंदेवाड,उद्धवराव बम्पलवार,संजय रेकुलवार, नंदकिशोर सिद्धेवार,धर्मेंद्र मुरगुलवार,यांची प्रमुख उपस्थिती होती.