उपाययोजना करण्याची मागणी
नांदेड। शहरात डासांच्या संख्येत वाढ झाली असून आजारांचे प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकाचे आयुक्त डॉ संजय लहाने यांना एका निवेदनामार्फत करण्यात आली आहे.
सोमवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ता स. लड्डूसिंघ काटगर, शिवसेनेचे स. गुरमीतसिंघ टमाना, भाजपा सिख आघाडीचे जिल्हा अध्यक्ष स. किरपालसिंघ हजुरीया, भाजपाचे स. जसबीरसिंघ धूपिया, व्यावसायिक स. हरदीपसिंघ घडीसाज आणि सामाजिक कार्यकर्ता स. लखनसिंघ लांगरी यांनी दि. 28 फेब्रुवारी रोजी मा. आयुक्त साहेब आणि मा. महापौर सौ. जयश्री पावडे यांची भेंट घेऊन वरील विषयावर चर्चा केली. प्रस्तुत निवेदनावर चर्चा करतांना आयुक्त डॉ संजय लहाने यांनी वरील विषयी त्वरित उपाययोजना करण्यासाठी प्रभावी पाऊल उचलण्यात असे आश्वासन दिले.
शहरात विविध भागात साठलेले सांडपाणी, मोकळे गटारी, नाल्या आणि छतावरील पाण्याच्या टाक्यांत डासांची उत्पत्ति होते. नियमित स्वछता व सफाई करण्यावर भर दिली गेली तर डासांमार्फत प्रसारीत होणाऱ्या आजारांवर प्रतिबन्ध घालता येणे शक्य आहे. असे आयुक्त यांनी चर्चे दरम्यान सांगितले. शहरात मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारावर त्वरित आळा घालण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी चर्चेत गुरुद्वारा भागातील गेट क्रमांक एक ते गेट क्रमांक सहा समोर व भोवतालच्या भागात डासांची उत्पत्ति रोखण्यासाठी प्रभावी उपाय-योजना राबविण्यात येईल. फॉगिंग मशीनचा वापर करून किंवा रसायन शिंपडून डासांची उत्पत्ति रोखण्याचे प्रयत्न केले जाईल असे आयुक्त यांनी सांगितले.
मा. महापौर सौ. जयश्री पावडे ताई यांनी अबचलनगर कॉलोनी मधील सेक्टर नंबर 14 आणि सोबतच्या काही रहिवाशी क्षेत्रातील मोकळे ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी लवकरच आदेश देण्यात येईल असे आश्वासन दिले.