नांदेड| महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित १८ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला नांदेड शहरातील कुसूम सभागृह येथे, २४ मार्च ते २५ मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या दोन दिवसीय बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन अपर्णा नेरलकर (अध्यक्षा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा नांदेड तथा सभापती महिला व बालकल्याण समिती) डॉ. विजयकुमार माहूरे (जेष्ठ रंगकर्मी) यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पुजन व दीप प्रज्वलनाने झाले. याप्रसंगी परिक्षक म्हणून लाभलेले डॉ. मधुमती पवार, श्री उमेश घळसासी, प्रा. देवदत्त पाठक, समन्वयक दिनेश कवडे अदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकुण ५ नाट्यप्रयोगांचे सादरीकरण झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हंगरगा यांच्या वतीने मीरा शेंडगे लिखित, गुलाबराव पावडे दिग्दर्शीत "तेलेजू" , रामरावजी लोहट पब्लिक स्कूल, परभणी यांचे त्र्यंबक वडसकर लिखित, तुळशीराम हनवते दिग्दर्शित "देहाची पूजा", जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय, परभणी यांचे त्र्यंबक वडसकर लिखित, राजू वाघ दिग्दर्शित "मुखवटे", क्रांती हुतात्मा चारीटेबल ट्रस्ट परभणी धनंजय सरदेशपांडे लिखित, मनीषा उमरीकर दिग्दर्शित "बुद्धाची गोष्ट",
नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोखरणी जिल्हा परभणी यांचे त्र्यंबक वडसकर लिखित व दिग्दर्शित "जगण्याचा खो" या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण झाले तर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रियदर्शनी मेमोरियल ट्रस्ट, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, अमोल गादेकर दिग्दर्शित "हॅलो मी देवबाप्पा बोलतोय", नवरत्न रामराव मेमोरियल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने महेश घुंगरे लिखित, दिग्दर्शित "शाळा", राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने धंनजय सारदेशपांडे लिखित, रवी पुराणिक दिग्दर्शित "मदर्स डे", बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने धंनजय सारदेशपांडे लिखित, रवी पाठक दिग्दर्शित "गिव्ह मी सनशाईन", अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, अनुराधा पांडे दिग्दर्शित "मी चोरी केली" या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण झाले.
दोन वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर वावरता आले याचा आनंद बाल कलावंतांच्या चेहऱ्यावर दिसत होते. कोरोनामुळे चार भिंतीत कैद झालेलं मुलांचं आयुष्य या निमित्ताने फुलू लागले. विदयार्थ्यांच्या परीक्षा सुरू असतानाही स्पर्धेला होणारी गर्दीपाहून बाल रंगभूमीला नक्की चांगले दिवस येतील अशी आशा प्रबळ होते.स्पर्धा यशस्वीतेसाठी, समन्वयक म्हणून दिनेश कवडे, निवृत्ती कदम, श्याम डुकरे, अक्षय राठोड, सुधांशु सामलेट्टी, प्रीतम भद्रे, संदेश राऊत, पूर्वा देशमुख, स्नेहा बिरादार यांनी काम पाहिले.