अमराबाद तांडा येथे डुकराच्या मटनाच्या हिश्यावरुन एकाचा खुन -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
तालुक्यातील आमराबाद तांडा येथे डुकराच्या मटनाच्या हिशावरुन वादावादी होऊन एकास लाथा बुक्क्यांनी व लोखंडी सरळीने मारुन या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून,१ मार्च ला याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अर्धापूर तालुक्यातील अमराबाद तांडा येथील श्रीनिवास बालाजी पवार वय  (२८) डुकराच्या मटनासाठी १०० रुपये दिले होते, पण ३०० रुपये दिल्यासच डुकराचे मटन मिळेल असे  पाच जणांनी सांगितले,या कारणावरुन श्रीनिवास पवार व ईतर पाच जणात प्रारंभी वादावादी होऊन यांचे पर्यावसान हाणामारीत झाले यामध्ये पवार यांचा मृत्यू झाला, याप्रकरणी  रंजीत अंगुर पवार, वकील अंगूर पवार,अंगूर बंधू पवार व ईतर २ महिला यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील,पोलिस निरीक्षक अशोक जाधव, जमादार राजेश घुन्नर, बाबुराव जाधव,गुरुदास आरेवार यांनी भेट दिली,ही घटना उशिरा घडल्याने १ मार्च ला फिर्यादी बालाजी हरलाल पवार यांच्या फिर्यादीवरून वरील ५ आरोपींविरुद्ध ३०२, भादवी ३४  प्रमाणे आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प़ोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे  व रुपेश नरवाडे हे अधीक तपास करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी