पाच ब्राह्मणांच्या मधुर वाणीतील वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराचा जयघोष
हिमायतनगर, अनिल मादसवार| संबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीला वाढोण्याच्याचे आराध्य दैवत श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा तहसीलदार गायकवाड यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. तत्पूर्वी शासकीय महापूजा पुरोहिताच्या मंत्रोचार वाणीत विधिवत संपन्न झाली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे श्री परमेश्वर दर्शन बंद होते. यंदा यात्रा रद्द असली तरी श्री दर्शनाची मुभा भाविकांना देण्यात आली आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला हजारो भाविकांनी रांगेत श्रीचे दर्शन घेतले. अलंकार सोहळ्यानंतर आजपासून ५ दिवस भाविकांनी अलंकारमय श्रीचे दर्शन घेता येणार आहे.
येथील श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री सप्ताहाला दि.२७ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह, विना पहारा, व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने मंदिराचा कळस व मुख्य कमानीवर आकर्षक विद्दुत रोषनाई करण्यात आली असून, महाशिवरात्रीला मध्यरात्री १ वाजल्या पासूनच मंदिरात हजारो भाविकांनी रांगा लाऊन हरिहर रूपातील श्री परमेश्वर म्हणजे भोळ्या शंकरचे दर्शन घेतले. तसेच शिवपुराणकार अभिमन्यू गिरी महाराज पैठणकर यांच्या कितर्नानंतर शिव - पावर्तीचा मुख्य अभीषेक सोहळा संपन्न झाला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मूर्तीला अलंकाराने सजविण्याचे कार्य येथील सुवर्णकार बाबुराव स्क्वान यांनी मंदिर कमिटी संचालकांच्या सहकार्याने केले.
मध्यरात्रीला पुरोहीत कांतागुरु वाळके, प्रवीण वाळके, साईनाथ बडवे, राजू जोशी, परमेश्वर बडवे यां पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चारात श्रीचा अभीषेक सोहळा व शासकीय महापुजा तहसीलदार डी.एन.गायकवाड यांनी सपत्नीक केली. यावेळी सांब सदाशिव... हर हर महादेवाच्या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता. त्यानंतर मध्यरात्री २ वाजता संचालक मंडळांच्या उपस्थितीत अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. या अलंकाराने विभुषीत केलेल्या श्री परमेश्वर मूर्तीचे दर्शन भाविक भक्तांना दहीहांडी गोपाल काल्यापर्यंन्त घेता येणार आहे. या सगून रूपात श्री परमेश्वराची मुर्ती पाहुन भावीक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात असे जुने जाणकार सांगतात.
या सोहळ्याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार हिमायतनगर, उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सदस्य लक्ष्मणराव शक्करगे, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, आनंता देवकते, मुलचंद पिंचा, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल सेठ, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार व लिपीक बाबुरावजी भोयर, सुभाष शिंदे, संतोष गाजेवार, रामू नरवाडे, मारोती हेंद्रे, विठ्ठल ठाकरे, संजय माने, गजानन चायल, गोविंद शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, गजानन वारकडं, उदय देशपांडे, पापा पार्डीकर, निक्कू ठाकूर, वैभव डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, पोलीस जमादार अशोक सिंगणवाड, जमादार ठाकरे, सुरक्षा रक्षक परमेश्वर शिंदे यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थीत होते.