हिमायतनगरच्या १९ कोटीच्या पाणीपुरवठा नळयोजनेच्या कामात अनियमितता -NNL

अभियंत्याच्या मनमानीमुळे अनेक प्रभागातील नागरिक पाण्यापासून वंचित राहण्याची भीती 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहराचा कायम स्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत १९ कोटीच्या निधीला मंजुरी होऊन मागील वर्षांपासून पाणीपुरवठा नळयोजनेचे काम सुरु झाले आहे. सदर नळयोजनेचे काम करताना ठेकेदाराने सुरुवातीला शहराच्या चारही दिषेने जलकुंभ उभारणी करणे गरजेचे होते. परंतु जलकुंभाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच शहरात नव्याने करण्यात आलेले कोट्यवधींच्या निधीतील रस्ते फोडून पाणी पुरवठ्याच्या पाईपलाइन टाकण्याचे काम चालू केले आहे. त्यातही अनेक प्रभागात पाईपलाईन करण्यात ठेकेदार व देखरेख करणाऱ्या अभियंत्याने भेदभाव चालविला आहे. त्यामुळे शासनाची पाणी पुरवठा नळ योजना जनतेसाठी कि..? ठेकेदाराच्या फायद्यासाठी असा..? सवाल करत येथील वॉर्ड क्रमांक १७ च्या माजी नगरसेविका सुरेखाताई सातव यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी टक्कर देऊन शहरातील सर्वच भागात नळयोजनेचे काम करून घराघरात पाणी द्यावे अन्यथा नागरिकांना घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान योजने अंतर्गत हिमायतनगर शहरासाठी १९ कोटी ५९ लक्ष रुपयाच्या मंजूर पाणी पुरवठा योजनेच्या कामाला प्रत्यक्षात दीड वर्षांपूर्वी सुरुवात झाली. सदरील योजनेचा काम सुरु होण्यापूर्वी योजनेअंतर्गत शहराच्या चाराही बाजूने ४ ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्याचे काम चालू झाले. मात्र अद्याप एकही टाकीचे काम पूर्णत्वास गेले नाही. ज्या टाकीचे काम सुरु आहे, बोरगडी रोडवरील त्या जलकुंभाची क्षमता ३.६० लक्ष लिटर असून हे काम अजूनही अर्धवट आहे. किनवट-नांदेड रोडवरील बंडेवार यांच्या ले-आउट मधील न.पं.च्या जागेत ५ लक्ष लिटर क्षमतेची एक टाकी होणार आहे. तर फुलेनगर येथे ६० हजार लिटर क्षमतेची टाकीचे काम चालू असून, येथील टाकीचे बांधकाम चकाकी एका शेतात करण्यात येत असून, जलकुंभाच्या कामाची म्हणावी तशी क्युरिंग होत नसल्याने गुणवत्ता ढासळली आहे. मोहम्मदिया कॉलनी भोकर रोड येथे ५० हजार लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात येणार असून, आणखी एक टाकी शहरातील वराड विनायक मंदिराच्या परिसरात घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. परंत्तू शहरातील वॉर्ड क्रमांक, १२,११,१३, ०८ नंबर वॉर्डातील नागरिकांच्या पाण्याची सोय कशी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण या भागात पाण्याचा पुरवठा करायचा म्हणजे परमेश्वर मंदिर परिसरात आणखी एक जलकुंभ उभारणे गरजेचे आहे. परंतु याकडे येथे कार्यरत अभियंत्याचे अक्षम्य लक्ष नसल्याने हि योजना ठेकेदार आणि राजकीय नेते व अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी  राबविण्यात येते आहे कि काय..? असा प्रश्न शहर वासियांतून उपस्थित केला जात आहे. 

एव्हडेच नाहीतर या भागात आणखी पाईपलाईन तर झालीच नाही जिथे चालू आहे, तेथील काम अर्धवट ठेऊन तात्काळ इतर वॉर्डात पाईपलाईन करण्याला सुरुवात केल्याने वॉर्ड क्रमांक १७ मधील नागरिकांचा पाण्यासाठी वंचित ठेवण्याचा प्रयत्न अभियंता व ठेकदाराकडून केला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शहरातील वॉर्ड क्रमांक १७ मधील फुले नगर भागात सुरु असलेल्या जलकुंभाचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याची ओरड नागरीकातून होत आहे, कारण सुरु असलेल्या टाकीचे कामावर मजबुतीकरणासाठी पाणी टाकले जात नसल्याने कोणत्याही क्षणी हे जलकुंभ कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच या टाकीच्या अखत्यारीत येणाऱ्या बऱ्हाळी तांडा, फुले नगर भागात पाईपलाईन झाली नसल्याने १९ कोटी खर्चूनही पिण्यासाठी पाणी मिळेल कि नाही अशी साशंकता नागरीकातून व्यक्त केली जात आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्हाळी तांडा येथील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे, आजही या नागरिकांना २ किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. तरीदेखील या भागाकडे नळयोजनेच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्याऐवजी अधिकारी व ठेकेदार मनमानी पद्धतीने नळयोजनेचे काम करून देण्याकडे काढण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत आहे.   

नागरिकांच्या या तक्रारीवरून हादगावचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील व मुख्याधिकारी गायकवाड यांची भेट घेऊन माजी नगरसेविका सौ सुरेखा सातव आणि सदाशिव सातव यांनी या संदर्भात तक्रार देऊन नारायण नगरमध्ये वाढीव नळयोजना करण्यात यावी. आणि शहरातील सर्वच नागरिकांच्या सुविधेसाठी नळयोजनेचे काम दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे अन्यथा ठेकेदार, अभियंत्याच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.   

एकूणच शहराचा कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रथमतः शहरातील सर्वच बाजूने ५ जलकुंभ होणे गरजेचे त्यासाठी अगोदर ज्या पैनगंगा नदीकाठावरून नळयोजना मंजूर झाली त्या ठिकाणी जलसाठवणीचे टाके होणे गरजेचे आहे. त्या टाक्याच्या कामाला अजूनही सुरुवात झाली नसल्याने केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शहरात १९ कोटीच्या पाणी पुरवठ्याचे काम केले जाते कि काय..? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे.त्यामुळे शासनाच्या पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडाला असून, यास संबंधित ठेकेदार, काही राजकीय पुढारी आणि देखरेख करणारे नगरपंचायतीचे अभियंता यास जबाबदार असल्याचा आरोप विकासप्रेमी जनता आणि गेल्या ५० वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यातून केला जात आहे. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी