तिजोरीत पैसा आहे पण मनात नसल्याने दोन वर्षात शासनाने गरिबांना एक फुटकी कवडी दिला नाही_NNL

देवेंद्र फडणवीसांचा राज्य शासनाला टोला


बिलोली|
देशातील सर्वात जास्त महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे.सर्वात जास्त पैसा याच सरकारच्या तिजोरीत आहे.असे असतानाही केवळ सरकार मनात नसल्याने सत्तेवर येताच गोरगरीब जनतेसाठी राबविण्यात आलेल्या वैधानिक विकास महामंडळासारख्या अनेक महत्वाच्या योजना बंद केल्या असून या सरकारने गेल्या दोन वर्षात राज्यातील गोरगरीबांना एक फुटकी कवडी पैसाही दिला नाही.ये पब्लिक है सब जानती है! ये पब्लिक है अशी खोचक टिका करत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी महाविकास आघाडी सरकारचे धिंडवडे काढले.तर चव्हाणांविषयी बोलताना मराठा आरक्षण अशोकरावांनी घालवलं.अशोकरावांना निवडणूका आल्या की पैसा फेको तमाशा देखो हेच तंत्र त्यांना समजत असेही विधान यावेळी फडणवीस यांनी केले.

ते दि.२५ रोजी बिलोली येथे देगलुर बिलोली  विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीतील भाजपा व मिञ पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष पिराजीराव साबणे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेत बोलत होते.यावेळी केंद्रीय रसायन मंञी भगवंत खुब्बा,केंद्रित सामाजिक मंत्री रामदास आठवले,राज्याचे माजी मंत्री बबणराव लोणीकर,माजी मंञी राम शिंदे,जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पा.चिखलीकर,विधान परिषद सदस्य राम पा.रातोळीकर,आमदार तुषार राठोड,आ.राजेश पवार,माजी आमदार सुधाकर ,भालेराव,डाँ.अजित गोपछडे, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगावकर,माजी आमदार गंगाराम ठाक्करवाड,जिल्हा परिषद सदस्य प्रणिताताई देवरे/चिखलीकर,पुनम पवार,श्रावण पा.भिलवंडे,बालाजी बच्चेवार,माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे,तालुकाध्यक्ष श्रीनिवास पा.नरवाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात जनसमूदाय उपस्थित होता. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणूकीतील भाजपाचे उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे यांचा पंधरा वर्षाच्या विधानसभा कामकाजाचा अनुभव व त्यांनी केलेली कामे याचे कौतुक करून साबणे यांना या भागाच्या विकासाकरीता भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन मतदारांना केले. या मतदार संघात अशोकरावांना त्यांच्या धनशक्तीचा कोणताही उपयोग होणार नसून या भागातील जनता विकास कामांची जाण असणाऱ्या सुभाष साबणे यांनाच मतदान करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

सत्ता असताना देगलुर मतदार संघात लक्षात राहिल असे काम केलात का ? चिखलीकरांचा पालकमंञ्यांना सवाल

 भास्करराव पा.खतगावकर भाजपामध्ये दाखल मध्यंतरी झालेल्या एका निवडणूकीत अशोकराव चव्हाणांबाबात खतगावकरांनी केलेल्या जाहीर विधानाची आँडीयो क्लिप मतदारां एकवून आपल्या भाषणाला सुरूवात केलेल्या चिखलीकरांनी तुमच्याकडे सत्ता असताना देगलूर,बिलोली,कुंडलवाडी या भागात लक्षात राहिल असे विकासकाम केलात का असा सवाल करत.तुमच्याकडे साठ वर्ष सत्ता असताना तुम्ही एक किलोमीटर नँशनल हायवे करून शकला नाहीत.माञ केंद्रित मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून भाजपा सरकारने ५३४ किलोमीटर नँशनल हायवेच काम आम्ही केल आहे.फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना चार वर्ष पिक विमा मिळत होता माञ गेल्या दोन वर्षात या सरकारने शेतकऱ्यांना पिक विमा का दिला नाहीत असे विचारत आम्ही वैयक्तिक टिका न करता विकास कामे व आम्ही केलेल्या कामांवर मत मागतो आसे विधान चिखलीकर यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी